India vs Australia | 3rd T20I ICC
क्रीडा

IND vs AUS, 3rd T20I: ऑस्ट्रेलिया संघात हेडचे कमबॅक, तर भारतीय संघातही मोठा बदल, पाहा 'प्लेइंग-11'

India vs Australia: भारताविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकली आहे.

Pranali Kodre

India vs Australia, 3rd T20I Match at Guwahati, Playing XI:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (28 नोव्हेंबर) खेळला जात आहे. हा सामना गुवाहाटीमधील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात असून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू हेडने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी दोन्ही संघात बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यापूर्वी १५ जणांच्या संघातील 6 खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणे निश्चित होते.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघात ट्रेविस हेड, केन रिचर्डसन, जेसन बेऱ्हेनडॉर्फ यांचे पुनरागमन झाले आहे.

तसेच भारतीय संघात एक मोठा बदल झाला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारच्या जागेवर आवेश खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. नाणेफेकीवेळी सूर्यकुमारने सांगितले आहे की मुकेशचे लग्न असल्याने तो खेळणार नाही.

निर्णायक सामना

भारताने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले असल्याने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघ तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करताना दिसेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मात्र आपले आव्हान राखण्यासाठी तिसऱ्या टी20 सामन्यात खेळताना दिसतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • भारत - यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, तिलक वर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिध कृष्णा

  • ऑस्ट्रेलिया - ट्रॅव्हिस हेड, ऍरॉन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/यष्टीरक्षक), नॅथन एलिस, जेसन बेऱ्हेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT