Ruturaj Gaikwad - Glenn Maxwell 
क्रीडा

IND vs AUS: विसावे षटक, 53 धावा अन् दोन शतके! तिसऱ्या T20 मध्ये शेवटच्या ओव्हरचा ड्रामा

India vs Australia, 3rd T20I: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुवाहाटीमध्ये झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात 20 वे षटक नाट्यमय ठरले.

Pranali Kodre

India vs Australia 3rd T20I Match at Guwahati, 20th Over:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू असून या मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटीला पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर 5 विकेट्सने विजय मिळवत मालिकेतील आव्हान कायम राखले.

दरम्यान, या सामन्यातील दोन्ही डावातील अखेरची षटके नाट्यपूर्ण ठरली होती. या सामन्यातील सर्वाधिक धावाही अखेरच्या षटकांमध्येच वसून झाल्या. भारताच्या डावाच्या 20 व्या षटकात तब्बल 30 धावा निघाल्या, तर ऑस्ट्रेलियाच्या डावात 20 व्या षटकात 23 धावा निघाल्या, म्हणजे दोन्ही डावातील फक्त 20 व्या षटकातच तब्बल 53 धावा काढण्यात आल्या.

ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. यावेळी 19 व्या षटकापर्यंत भारताने 3 बाद 192 धावा झाल्या होत्या. त्यावेळी ऋतुराज गायकवाड 96 धावांवर आणि तिलक वर्मा 30 धावांवर खेळत होता.

यावेळी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज केन रिचर्डसनला दुखापत झाल्याने कर्णधार मॅथ्यू वेडने ग्लेन मॅक्सवेलकडे अखेरच्या षटकात गोलंदाजी करण्याची जबाबदारी सोपवली.

मात्र या षटकात ऋतुराजचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. त्याने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, तर दुसरा चेंडू नो बॉल होता, पण त्यावर ऋतुराजने चौकार वसूल केला. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर ऋतुराज आणि तिलक यांनी प्रत्येकी एक धाव पळून काढली.

चौथा चेंडू मॅक्सवेलने वाईड टाकल्याने त्याला हा चेंडू पुन्हा टाकावा लागला. त्यावर ऋतुराजने पुन्हा एक खणखणीत षटकार ठोकला. पाचव्या चेंडूवरही ऋतुराजने षटकार मारला, तर सहाव्या चेंडूवर त्याने चौकार मारला. त्यामुळे या षटकात एकूण 30 धावा निघाल्या.

ऋतुराजने या षटकात त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतकही पूर्ण केले, तसेच भारताला 222 धावांपर्यंतही पोहचवले. ऋतुराज 123 धावांवर नाबाद राहिला, तर तिलक वर्मा 31 धावांवर नाबाद राहिला.

त्यानंतर भारताने दिलेल्या 223 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला अखेरच्या षटकात 21 धावांची गरज होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेल 86 धावांवर आणि मॅथ्यू वेड 23 धावांवर नाबाद होता.

तसेच अखेरच्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी भारताकडून प्रसिद्ध कृष्णा उतरला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वेडने चौकार ठोकला, तर दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव काढली. तिसऱ्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने अप्रतिम षटकार ठोकला, तर चौथ्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 2 चेंडूत 6 धावांची गरज होती.

यावेळी पाचव्या चेंडूवरही मॅक्सवेलने चौकार मारत त्याचे चौथे आंतरराष्ट्रीय टी20 शतक पूर्ण केले. यानंतर भारतीय खेळाडूंनी बरीच चर्चा केली. मात्र, अखेरच्या चेंडूवरही मॅक्सवेलने चौकार मारत ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला. मॅक्सवेल 104 धावांवर आणि वेड 28 धावांवर नाबाद राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT