India vs Australia 
क्रीडा

IND vs AUS, 3rd ODI: भारत - ऑस्ट्रेलिया संघात मिळून तब्बल 10 खेळाडूंचे पुनरागमन, पाहा 'प्लेइंग-11'

India vs Australia Playing XI: ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडेत नाणेफेक जिकंली आहे, तसेच या सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात अनेक मोठे बदल झाले आहेत.

Pranali Kodre

India vs Australia, 3rd ODI match at Rajkot, Playing XI:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारी वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळला जाणार आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारताने अनेक खेळाडू विविध कारणांनी अनुपलब्ध आहेत. त्यामुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाले आहेत. कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, कुलदीप यादव यांचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांचेही पुनरामन झाले आहे.

आर अश्विनला या सामन्यासाठी संधी देण्यात आली नाही, तर इशान किशन आजारी असल्याने उपलब्ध नाही. तथापि, रोहितने तिसऱ्या सामन्यापूर्वीच माहिती दिली होती की शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली आहे, तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर वैयक्तिक कारणामुळे घरी परतले आहेत.

तसेच काही खेळाडू आजारी आहेत, त्यामुळे भारताकडे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यासाठी १३ खेळाडूंचाच पर्याय उपलब्ध होता. त्यातूनच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया संघानेही या सामन्यासाठी तब्बल ५ बदल केले आहेत. कर्णधार पॅट कमिन्ससह, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श यांचे पुनरागमन झाले आहे, तर तनवीर संघाला पदार्पणाची संधी मिळाली आहे.

दरम्यान, हा सामना वर्ल्डकप २०२३ स्पर्धेपूर्वी होणारा अखेरचा सामना आहे, त्यामुळे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. पण असे असले तरी भारतीय संघाने या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत.

त्यामुळे भारताने ही मालिका आधीच खिशात घातली आहे, आता ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याची संधी भारताला असणार आहे, पण ऑस्ट्रेलिया देखील प्रतिष्ठा राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

  • ऑस्ट्रेलिया - मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! सायबर घोटाळ्याप्रकरणी 24 जण अटकेत!

Kartik Aaryan: ना गाजावाजा न कसाला धिंगाणा; कार्तिकने गोव्यात शांततेत साजरा केला वाढदिवस पाहा Photo, Video

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात चहा, कॉफीसारखे गरम पेय का टाळावेत?

SCROLL FOR NEXT