Team India Dainik Gomantak
क्रीडा

...अन् IND vs AUS सामन्यासाठी मैदानात पाणी नेण्यासाठी BCCI ला बोलवावे लागले चार स्थानिक खेळाडू

India vs Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघाच्या मदतीसाठी ४ स्थानिक खेळाडूंना मदतीसाठी बोलावण्यात आले आहे.

Pranali Kodre

India vs Australia 3rd ODI at Rajkot :

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर वनडे मालिकेतील तिसरा सामना सुरू आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात अनेक बदल करण्यात आले.

दरम्यान, बीसीसीआयने सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच माहिती दिली की ४ स्थानिक खेळाडूंना मदतीसाठी पाचारण केले आहे.

झाले असे की या सामन्यापूर्वीच रोहित शर्माने सांगितले होते की शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली आहे, तर मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर वैयक्तिक कारणामुळे घरी परतले आहेत. तसेच काही खेळाडू आजारी आहेत, त्यामुळे भारताकडे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यासाठी १३ खेळाडूंचाच पर्याय उपलब्ध होता. 

त्याचबरोबर बीसीसीआयने ट्वीटमध्येही सांगितले आहे की इशान किशन आजारी असल्याने या सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे धरमेंद्र जडेजा, प्रेरक मंकड, विश्वराज जडेजा आणि हार्विक देसाई या स्थानिक खेळाडूंना संघाला ड्रिंक्ससाठी आणि क्षेत्ररक्षणात मदतीसाठी बोलवण्यात आले आहे.

त्याचमुळे आता हे चार खेळाडू या सामन्यात भारतीय संघाला मैदानात पाणी पोहोचवण्याचे काम करतील, तसेच खेळाडू आणि ड्रेसिंग रुम यांच्यादरम्यान संदेश पोहचवण्याचे काम करतील.

दरम्यान, या सामन्यापूर्वी ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा हे खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात असल्याने त्यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात समावेश करण्यात आलेला.

तथापि, तिसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, कुलदीप यादव यांचे पुनरागमन झाले आहे. या तिघांनाही पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती.

याशिवाय वॉशिंग्टन सुंदरला आर अश्विनच्या जागेवर संधी देण्यात आली आहे. तसेच मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांचेही पुनरामन झाले आहे. त्यांना दुसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Adil Shahi Dynasty: युसूफ भारताकडे निघाला, 1461 मध्ये दाभोळ बंदरावर पोहोचला; आदिलशाही व तुर्की सल्तनत

Aamir Khan Video: पहिल्यांदाच जगासमोर आलं 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चं हिडन टॅलेन्ट, VIDEO पाहून विश्वासच बसणार नाही!

अपमानास्पद भाषा, ईदच्या सजावटीची नासधूस, एकता नगरात तणाव; पोलिसांनी महिलेला घेतलं ताब्यात

Borim Accident: बोरीत काँक्रेटवाहू ट्रकची कारला धडक, 6 जण जखमी; 12 वर्षीय मुलीचा समावेश

''गोवा में 15 साल भाजप आ नहीं सकती''; दिगंबर कामतांचा Video Viral, मुख्यमंत्र्यांनी वाजवल्या टाळ्या; नेटकरी थक्क!

SCROLL FOR NEXT