Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: आऊट होताच विराट कोहलीचा चढला पारा, ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल

Pranali Kodre

Virat Kohli Wicket: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. शनिवारी (१८ फेब्रुवारी) या सामन्याचा दुसरा दिवस होता. दरम्यान, या दिवशी भारताचा मधल्या फळीतील फलंदाज विराट कोहलीची विकेट वादग्रस्त ठरली. त्यामुळे तो नाराजी व्यक्त करतानाही दिसला.

या सामन्यात भारताने सलामीवीरांच्या विकेट गमावल्यानंतर विराट फलंदाजीसाठी आला होता. त्याने 66 धावांवर 4 विकेट्स अशा परिस्थितीनंतर रविंद्र जडेजाबरोबर भागीदारी करत भारताचा डाव सावरला होता. या दोघांचीही भागीदारी चांगली रंगत होती.

मात्र त्याचवेळी 50 व्या षटकात ऑस्ट्रेलियाकडून पहिला सामना खेळणाऱ्या मॅथ्यू कुहनेमनने विराटला बाद करत त्याची पहिली विकेट घेतली आणि भारतालाही मोठा धक्का दिला. मात्र ही विकेट वादग्रस्त ठरली. कारण कुहनेमनने टाकलेल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने पायचीतसाठी अपील केले होते. त्यावर मैदानावरील पंचांनी विराटला बाद करार दिलेला. पण विराटने रिव्ह्यूची मागणी केली.

या रिव्ह्यूमध्ये विराटच्या बॅट की पॅडला बॉल आधी लागला हे समजत नव्हते. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय अंतिम मानत चेंडूचा टप्पा तपासला. यामध्ये चेंडू योग्य टप्प्यात पडलेला दिसला मात्र, चेंडूचा अगदी थोडा स्पर्श स्टंपला होत होता. त्यामुळे अंपायर्स कॉल असा निर्णय तिसऱ्या पंचांनी दिल्यांनतर मैदानावरील पंचांचा निर्णयच अंतिम ठेवण्यात आला. त्यामुळे विराटने पॅव्हेलियनकडे परतताना नाराजी व्यक्त केली.

विराट जेव्हा बाद झाला, तेव्हा तो 84 चेंडूत 44 धावांवर खेळत होता. तसेच त्याने जडेजाबरोबर 59 धावांची भागीदारीही केली होती.

दरम्यान, ड्रेसिंग रुममध्ये परतल्यावर देखील विराट निराश दिसत होता. त्याने ड्रेसिंग रुममध्ये परतल्यावर पुन्हा एकदा रिप्ले पाहिला. ते पाहून त्याने त्याचा राग व्यक्त केला. त्याच्या विकेटच्या निर्णयावर प्रशिक्षकही निराश होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, विराट बाद झाल्यानंतर जडेजा (26) आणि श्रीकर भरतही (6) स्वस्तात माघारी परतले. पण त्यानंतर अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी 114 धावांची भागीदारी करत भारताचा हा डाव सांभाळला. पण अश्विन (37) आणि अक्षर (74) बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला 262 धावांवर सर्वबाद केले आणि 1 धावेची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 12 षटकात 1 बाद 61 धावा केल्या आहेत. ट्रेविस हेड 40 चेंडूत 39 धावांवर आणि मार्नस लॅब्युशेन 19 चेंडूत 16 धावांवर नाबाद आहेत. भारताकडून या डावात रविंद्र जडेजाने उस्मान ख्वाजाला 6 धावांवर बाद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT