Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: सूर्याच्या नेतृत्वाखाली खेळणार टीम इंडिया! पहिल्या T20 सामन्यासाठी कशी असेल 'प्लेइंग-11'?

Pranali Kodre

India vs Australia, 1st T20I, Predicted Playing XI:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ टी20 मालिकेत पुन्हा आमने-सामने येणार आहेत. गुरुवारपासून या दोन संघात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे.

या मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणमला होणार आहे. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. भारताच्या टी20 संघाचा नियमित कर्णधार हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त आहे, तर वर्ल्डकप 2023 स्पर्धेत खेळलेल्या अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

त्याचमुळे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघाचा भाग राहिलेल्या सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि प्रसिध कृष्णा अशा तीनच खेळाडूंना या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

तसेच टी२० मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाड उपकर्णधार आहे, तर चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी श्रेयस अय्यर उपकर्णधार असणार आहे. अशात पहिल्या टी२० सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, याबद्दल जाणून घेऊ.

सलामीसाठी भारताकडे इशान किशन, यशस्ली जयस्वाल आणि ऋतुराज असे तीन पर्याय आहेत. पण इशान मधल्या फळीतही खेळू शकत असल्याने जयस्वास आणि ऋतुराज हे सलामीला फलंदाजी करू शकतात, तर तिसऱ्या क्रमांकावर इशान फलंदाजीला उतरू शकतो.

त्याचबरोबर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव हे देखील मधल्या फळीत खेळू शकतात. सहाव्या क्रमांकावर रिंकू सिंग उतरु शकतो. अष्टपैलू म्हणून अक्षर पटेलला संधी मिळू शकते.

तसेच रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार हे गोलंदाजी फळीत खेळताना दिसू शकतात. बिश्नोई अक्षरबरोबर फिरकी गोलंदाजी सांभाळू शकतो, तसेच अर्शदीप, प्रसिध आणि मुकेश वेगवान गोलंदाजीची धूरा सांभाळू शकतात.

दरम्यान, पहिला टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता चालू होणार आहे.

पहिल्या टी20 सामन्यसाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन -

ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: 'वेलिंकरांना अटक करा, नाहीतर...'; संतप्त जमावाचा सरकारला अल्टिमेटम; डिचोलीत गुन्हा दाखल!

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Delhi Drug Case: मोठा खुलासा! गोव्यामार्गे दिल्लीत पोहोचले ड्रग्ज; साडेपाच हजार कोटींच्या 562 किलो कोकेन‌ची तस्करी

गोवा राजभाषा कायद्यात मराठी नको म्हणाणाऱ्या दामोदर मावजो यांची अभिजात दर्जानंतर पहिली प्रतिक्रिया; स्पृश्य - अस्पृश्यतेचा केला उल्लेख

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

SCROLL FOR NEXT