Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: रोहितच्या जागेवर 'हा' खेळाडू करणार शुभमन गिलसह 'ओपनिंग', कॅप्टन हार्दिकनेच केलं स्पष्ट

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडेत रोहित शर्मा अनुपस्थित राहणार असल्याने त्याच्याजागेवर कोण ओपनिंग करणार याबाबत हार्दिक पंड्याने स्पष्टीकरण दिले आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शुक्रवारपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

पहिल्या सामन्याला भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक कारणामुळे मुकणार आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी हार्दिक पंड्या या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान, या सामन्यात रोहित अनुपस्थित राहाणार असल्याने सलामीला त्याच्या जागेवर फलंदाजी कोण करणार हा मोठा प्रश्न अनेकांना पडला आहे.

भारताकडे सलामीसाठी सध्या शुभमन गिल, ईशान किशन आणि केएल राहुल असे पर्याय आहेत. यातील गिल प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पण त्याच्याबरोबर सलामीला ईशान की राहुल कोण फलंदाजी करणार हा प्रश्न आहे.

पण या सामन्याच्या पूर्वसंध्येला हार्दिकने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. हार्दिकने स्पष्ट केले आहे की गिलबरोबर ईशान किशलाच संधी दिली जाईल, असे हार्दिकने सांगितले आहे. गिल आणि ईशान यांनी यापूर्वी श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध जानेवारी महिन्यात झालेल्या टी२० मालिकेदरम्यान सलामीला फलंदाजी केली होती.

हार्दिकने सांगितले आहे की 'ईशान आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करतील. खेळपट्टी जशी वर्षभर राहिली आहे, तशीच दिसत आहे. मी इथे जवळपास सात वर्षे खेळलो आहे. हा सामना आव्हानात्मक असेल, कारण खेळपट्टी दोन्ही संघांना समान संधी देईल.'

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. त्यादृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. तसेच या मालिकेपूर्वी भारताने यावर्षी श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धही वनडे मालिका खेळली आहे.

याबद्दल विचारले असता हार्दिक म्हणाला, 'मला वाटत नाही की आम्ही काही नवीन प्रयोग केले आहेत. आम्ही फक्त थोडे धाडसी निर्णय घेण्याचे प्रयत्न केले. मला वाटते की गेल्या काही मालिकेत आम्ही चांगली कामगिरी केली आहे.'

'या सर्व द्विपक्षीय मालिका काहीशा आव्हानात्मक असतात. यातूनच आम्ही शिकून आयसीसी स्पर्धांमध्ये दबावामध्ये खेळू शकू. पण सध्या त्याचा विचार करण्याची गरज नाही. भूतकाळ हा भूतकाळ असतो आणि आम्ही पुढे येणाऱ्या गोष्टी चांगल्या असतील अशी आशा करतो.'

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेतून रोहित शर्मा भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT