Hardik Pandya Ignore Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Viral Video: 'माज चढलाय फक्त...', कॅप्टन हार्दिकनं चक्क कोहलीला चालू मॅचमध्ये केलं इग्नोर

India vs Australia: मुंबई वनडेदरम्यान कर्णधार हार्दिक पंड्या विराट कोहली बोलत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आला आहे. त्यामुळे चाहते त्याच्यावर चांगलेच संतापले आहेत.

Pranali Kodre

Hardik Pandya Ignore Virat Kohli: शुक्रवारी (17 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वनडे मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताचे नेतृत्व नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याने केले होते. त्यामुळे हार्दिकसाठी वनडे कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना ठरला. पण या सामन्यातील त्याचे विराट कोहलीबरोबरचे त्याचे एक वर्तन चाहत्यांना भावलेले नाही.

हार्दिकने यापूर्वी काही आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. मात्र, वनडेत नेतृत्व करण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच विराट कोहली, केएल राहुल असे काही सिनियर खेळाडू खेळत होते.

या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी उतरली असतानाचा एका घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की कर्णधार हार्दिक विराट आणि गोलंदाज कुलदीप यादव हे चर्चा करत आहेत. या चर्चेदरम्यान विराट काहीतरी बोलत असतानाच मध्येच हार्दिक चर्चा सोडून निघून जातो. त्यावेळी विराटचं बोलणं अर्धवटच झाल्याचे दिसून येत आहे. हार्दिक असा निघून गेल्याने विराट चकीत झाल्याचेही दिसून येतो. त्यानंतर तो कुलदीपशी बोलून क्षेत्ररक्षण करण्यासाठी जातो.

दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या घटनेदरम्यान नक्की झाले काय होते, याबद्दल स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, व्हिडिओत दिसणाऱ्या दृश्यांवरून तरी हार्दिक विराटकडे दुर्लक्ष करून निघून जात असल्याचा दावा अनेक युजर्सने केला आहे. तसेच अनेक चाहत्यांनी हार्दिकला कर्णधारपदाचा माज आला असल्याचेही ऐकवले आहे. तशा प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटत आहेत.

विजयी सुरुवात

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियन संघाला 35.4 षटकातच 188 धावांवर रोखले. त्यानंतर 189 धावांचा पाठलाग भारताने 5 विकेट्स गमावत 40 व्या षटकातच पूर्ण केला. त्यामुळे हा सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला. त्याचमुळे हार्दिकने वनडे कर्णधार म्हणूनही विजयी सुरुवात केली.

म्हणून रोहित अनुपस्थित

पहिल्या वनडेसाठी रोहित अनुपस्थित राहण्याचे कारण म्हणजे त्याने त्याच्या मेव्हण्याच्या लग्नासाठी सुट्टी घेतली होती. याबद्दल त्याने बीसीसीआयला यापूर्वीच कळवले होते. त्यामुळे पहिल्या वनडेत रोहितऐवजी हार्दिकने भारताचे नेतृत्व केले.

पण रोहित आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेतून पुनरागमन करणार आहे. त्यामुळे 19 मार्च आणि 22 मार्च रोजी होणाऱ्या अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेत रोहितच भारताचे नेतृत्व करताना दिसेल,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रॅक्टरला रथासारखी चाकं... सोशल मीडियावर व्हायरल झाला भन्नाट 'जुगाड', लोक म्हणाले, "हा आहे नवा भारत"

Shubman Gill Era Begins! पहिल्याच वनडेत 'कॅप्टन कूल' धोनीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

SCROLL FOR NEXT