Team India Dainik Gomantak
क्रीडा

Team India: भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक बातमी, टीम इंडियाची 'ही' एकदिवसीय मालिका रद्द?

Indian Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया इंग्लंडमधील ओव्हल येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final 2023) चा अंतिम सामना खेळतील.

Manish Jadhav

Team India Schedule FTP Schedule: इंडियन प्रीमियर लीग 2023 चा अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे. यानंतर, भारत आणि ऑस्ट्रेलिया इंग्लंडमधील ओव्हल येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final 2023) चा अंतिम सामना खेळतील.

या सामन्यानंतर टीम इंडियाला एकदिवसीय मालिका खेळायची होती. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ही मालिका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाची ही एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात आली

बीसीसीआयची (BCCI) विशेष सर्वसाधारण सभा (SGM) शनिवार 27 मे रोजी झाली. या बैठकीनंतर एक मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाला डब्ल्यूटीसी फायनल आणि वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी एक मालिका खेळायची होती, जी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

भारतीय संघ जूनमध्येच अफगाणिस्तानविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार होता. पण ही मालिका आता सप्टेंबरमध्ये खेळवली जाऊ शकते. भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही मालिका आयोजित करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

WTC फायनल नंतर वेस्ट इंडिज दौरा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final 2023) चा अंतिम सामना खेळल्यानंतर, भारतीय संघ 12 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान कॅरिबियन भूमीवर दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळेल.

त्याचबरोबर, सप्टेंबरमध्ये आशिया कप आणि त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत मोठ्या स्पर्धा लक्षात घेऊन खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक अद्याप ठरलेले नाही.

दोन्ही मंडळे लवकरच मोठा निर्णय घेणार आहेत

आता भारत (India) आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही मालिका सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मालिकेपूर्वी किंवा नंतर होणार आहे. येत्या काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मीरवाइज अश्रफ सध्या भारतात आहेत. आयपीएलची फायनल पाहण्यासाठी मीरवाइज अश्रफ येथे आले आहेत.

त्याचवेळी, 28 मे रोजी एसीसीची बैठक होणार आहे. त्या दरम्यान दोन्ही बोर्ड एकदिवसीय मालिकेबद्दल चर्चा करु शकतात. आशिया चषक 2023 बाबतही या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT