Rohit Sharma PTI
क्रीडा

IND vs AFG, 1st T20I: रोहितने जिंकला टॉस! यष्टीरक्षक म्हणून संजू नाही, तर 'या' खेळाडूला संधी, पाहा 'प्लेइंग-11'

Pranali Kodre

India vs Afghanistan, 1st T20I Match at Mohali, Playing XI:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात गुरुवारपासून (11 जानेवारी) तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियम येथे होत आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, रोहित तब्बल 14 महिन्यांनी भारताकडून टी20 क्रिकेट खेळताना दिसणार आहे. तो नोव्हेंबर 2022 मध्ये टी20 वर्ल्डकपमध्ये अखेरचा टी20 सामना खेळला होता.

दरम्यान, भारताने यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनच्या आधी जितेश शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये पसंती दिली आहे. तसेच यशस्वी जयस्वाल, आवेश खान आणि कुलदीप यादव यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही.

तसेच अफगाणिस्तान संघाला या मालिकेपूर्वीच राशिद खान खेळणार नसल्याने धक्का बसला आहे. राशिदच्या पाठीवर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यातून तो पूर्ण सावरला नसल्याने ही मालिका खेळणार नाही. त्यामुळे अफगाणिस्तानचे नेतृत्व इब्राहिम झाद्रान करत आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

  • अफगाणिस्तान - रहमानउल्ला गुरबाज(यष्टीरक्षक), इब्राहिम झाद्रान(कर्णधार), रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झाद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान

पहिली द्विपक्षीय मालिका

दरम्यान, ही मालिका टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. भारताची जूनमध्ये सुरु होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेपूर्वीची ही अखेरची टी20 मालिका आहे.

तसेच भारत आणि अफगाणिस्तान संघात होत असलेली ही पहिलीच द्विपक्षीय टी20 मालिका आहे. भारत आणि अफगाणिस्तान यापूर्वी अनेकदा वेगवेगळ्या टी20 स्पर्धांमध्ये आमने-सामने आले आहेत. मात्र, त्यांच्यात आत्तापर्यंत द्विपक्षीय टी20 मालिका झाली नव्हती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

Sunburn Festival 2024: सनबर्नविरोधात कामुर्लीत स्थानिकांचा कडक विरोध; उद्याची बैठक ठरणार निर्णायक!

Mhadei Water Dispute: ...कर्नाटकाविरोधात लढण्यास सावंत सरकार ठरले कुचकामी; आलेमाव यांचा घणाघात

SCROLL FOR NEXT