येत्या ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्डकप होणार आहे. त्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी 2023 ला भारतात वनडे वर्ल्डकप होत आहे. त्यामुळे भारतीय संघाला दरम्यानच्या काळात टी 20 आणि वनडे सामने जास्त खेळावे लागणार आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे तर 3 सामन्यांची T20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळत आहे. (India to play ODIs before Asia Cup BCCI gives green signal)
यानंतर भारतीय संघाला 5 सामन्यांची T20 आणि 3 सामन्यांची वनडे मालिका देखील खेळायची आहे. दरम्यान, बीसीसीआय आणि झिम्बाब्वे यांच्यातील कराराची बातमी समोर आली, ज्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला पुढील महिन्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करावा लागणार आहे.
भारत झिम्बाब्वेसोबत एकदिवसीय मालिका खेळणार
या दौऱ्याच्या अधिकृत तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत, परंतु क्रिकबझने अहवाल दिला आहे की हे सामने ICC वन डे सुपर लीगचा भाग असतील आणि ते 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी खेळले जातील. झिम्बाब्वेसाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे कारण पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी ते गुण मोजले जाणार आहेत.
क्रिकबझशी बोलताना झिम्बाब्वे क्रिकेट (ZC) अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला भारताचे यजमानपद मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. आम्ही सर्व एका रोमांचक आणि संस्मरणीय मालिकेची वाट पाहत आहोत.
आशिया कप ऑगस्टमध्येच खेळवला जाणार आहे
विशेष म्हणजे या मालिकेनंतर भारतीय संघाला श्रीलंकेसोबत 3 सामन्यांची वनडे मालिका देखील खेळायची आहे. त्यामुळे श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या आशिया कपलाही ऑगस्ट महिन्यातच सुरुवात होईल. अधिकृत तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.