Sachin Dhas & Captain Uday Saharan | U19 Cricket World Cup | India U19 vs Nepal U19 X/BCCI
क्रीडा

U19 World Cup: उदय-सचिनची खणखणीत शतके! भारताचे सुपर सिक्सच्या सामन्यात नेपाळसमोर 298 धावांचे लक्ष्य

India U19 vs Nepal U19: 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत सुपर सिक्सच्या सामन्यात कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांच्या शतकाच्या जोरावर भारताने नेपाळसमोर 298 धावांचे आव्हान ठेवले आहे.

Pranali Kodre

U19 Cricket World Cup 2024, India U19 vs Nepal U19

दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत सुपर सिक्स फेरीत शुक्रवारी भारत आणि नेपाळ हे दोन 19 वर्षांखालील संघ आमने-सामने आहेत. ब्लोएमफाँटेन येथे होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नेपाळसमोर विजयासाठी 298 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

भारतीय संघाकडून कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस या दोघांनीही खणखणीत शतके ठोकली. हा सामना उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नेपाळने चांगली सुरुवात केली. त्यांच्याकडून गुलशन झाने सलामीवीर आदर्श सिंगला पाचव्याच षटकात 21 धावांवर बाद केले.

त्यानंतर सलामीवीर अर्शिन कुलकर्णी आणि प्रियांशू मोलिया यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे दोघेही 14 व्या षटकात लागोपाठच्या चेंडूवर बाद झाले. अर्शिनने 18 धावा केल्या, तर प्रियांशू 19 धावांवर धावबाद झाला.

यानंतर मात्र सचिन धस आणि कर्णधार उदय सहारन यांनी नेपाळला मोठे यश मिळू दिले नाही. या दोघांनीही भारताचा डाव पुढे नेताना चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. या दोघांनी 215 धावांची भागीदारी केली.

या भागीदारीदरम्यान सचिनने त्याचे शतक पूर्ण केले. पण गुलशनने त्याला ११६ धावांवर बाद केले. सचिनने 101 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह ही खेळी केली. तसेच नंतर उदयने देखील शतक पूर्ण केले.

परंतु तो शतकांनंतर लगेचच अखेरच्या षटकात बाद झाला. त्याने 107 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार ठोकले. पण त्यामुळे भारताला 50 षटकात 5 बाद 297 धावा करता आल्या.

नेपाळकडून गुलशन झा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच आकाश चंद याने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT