Sai Sudarshan- KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

SA vs IND: साई सुदर्शन-KL राहुलची फिफ्टी; दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Manish Jadhav

South Africa vs India, 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गकबेराह येथील सेंट जॉर्ज पार्क येथे खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ 46.2 षटकात 211 धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

टीम इंडिया पूर्ण 50 षटकेही खेळू शकली नाही

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला 211 धावांत गुंडाळले. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. आवेश खानच्या रुपाने टीम इंडियाला 10 वा धक्का बसला. नऊ चेंडूंवर नऊ धावा करुन तो धावबाद झाला. भारताचा डाव 46.2 षटकात सर्वबाद 211 धावांवर आटोपला. भारताकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 62 धावा केल्या. कर्णधार केएल राहुलने 56 धावांची खेळी केली. अर्शदीप सिंगने 18 धावा केल्या. रिंकू सिंहला पदार्पणाच्या सामन्यात केवळ 17 धावा करता आल्या. संजू सॅमसन 10 धावा करुन बाद झाला तर तिलक वर्मा 10 धावा करुन बाद झाला. आवेश खान नऊ, अक्षर पटेल सात, ऋतुराज गायकवाड चार आणि कुलदीप यादव एक धाव करुन बाद झाला. मुकेश कुमारने नाबाद चार धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने तीन बळी घेतले. ब्यूरेन हेंड्रिक्स आणि केशव महाराज यांना प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. लिझाद विल्यमसन आणि एडन मार्करम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दरम्यान, पॉवरप्लेमध्ये भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर संघाने 4 धावांच्या स्कोअरवर पहिली विकेट गमावली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड एलबीडब्ल्यू झाला. ऋतुराज बाद झाल्यानंतर साई सुदर्शन आणि तिलक वर्मा या जोडीने पॉवरप्लेमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळली. दोघांनी 42 धावा जोडल्या. पहिल्या 10 षटकात भारतीय संघाने एक विकेट गमावून केवळ 46 धावा केल्या होत्या.

मधल्या षटकांत भारतीय फलंदाज ढेपाळले, 6 विकेट पडल्या

दुसरीकडे, पॉवरप्लेमध्ये संथ सुरुवात केल्यानंतर मधल्या फळीत भारतीय फलंदाजीची कोंडी झाली. भारतीय संघाने मधल्या षटकात 6 गडी गमावून 131 धावा केल्या. 40 षटकांनंतर भारतीय संघाची धावसंख्या 177/7 होती.

KL राहुलचे 18 वे अर्धशतक, यावर्षी 1000+ धावा केल्या

KL राहुलने 56 धावांची खेळी खेळली. त्याने 60 चेंडूत अर्धशतक केले. केएल राहुलचे हे वनडेतील 18 वे अर्धशतक आहे. त्याने यावर्षी 1000 धावा केल्या आहेत.

साई सुदर्शनचे सलग दुसरे अर्धशतक

सुदर्शनने 65 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने 83 चेंडूत 62 धावांची खेळी खेळली. त्याच्या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता. साई सुदर्शनने त्याच्या वनडे कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. सुदर्शनने गेल्या सामन्यात पदार्पण करत अर्धशतक केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BCCI Central Contract: बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक! रोहित-विराटचं 'डिमोशन' तर शुभमन गिलचं टॉपचं प्रमोशन; सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर

India vs Pakistan: क्रीडाविश्वात हाय-व्होल्टेज ड्रामा! भारत-पाक महामुकाबल्यावर बहिष्काराचं सावट; आयसीसीनं धुडकावल्या मोहसीन नक्वीच्या मागण्या

Nerul: सफर गोव्याची! 400 वर्षांपूर्वी दैवत हलवून मांद्रे येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले; भक्तीरसातले 'नेरुळ'

Esakal: विश्वासार्हतेचा विजय! मराठी मनाचा मानबिंदू आता डिजिटलचाही 'राजा'; 5.6 कोटी युजर्ससह ई-सकाळ नंबर-1

Surya Grahan 2026: यंदाची महाशिवरात्री ठरणार 'टर्निंग पॉईंट'! सूर्यग्रहण कोणासाठी शुभ-अशुभ? 'या' 4 राशींच्या अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT