Asian Para Games 
क्रीडा

Asian Para Games: भारतीय खेळाडूंचा चीनमध्ये झेंडा, नेत्रदिपक कामगिरीसह जिंकली आतापर्यंची सर्वाधिक पदके

आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारतीय खेळाडूंनी यंदा ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

Pranali Kodre

India registered highest medal tally at the Asian Para Games History: आशियाई पॅरा क्रीडा 2023 स्पर्धेत भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी गुरुवारी (26 ऑक्टोबर) म्हणजेच स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही कायम आहे. चीनमध्ये सुरु असेलल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पहिल्या दिवसापासून शानदार कामगिरी केली आहे. याबरोबर आता या स्पर्धेत मोठा इतिहासही घडला आहे.

यंदा भारतीय खेळाडूंनी मिळून या स्पर्धेत चौथ्या दिवशी दुपारी 2 पर्यंत 80 पदके जिंकली आहेत. त्यामुळे ही आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

यापूर्वी भारतीय पथकाने 2018 साली जकार्ताला झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत 72 पदके जिंकली होती. ही आत्तापर्यंतही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती, पण आता या कामगिरीला यावर्षी भारतीय खेळाडूंनी 73 हून अधिक पदके जिंकत मागे टाकले आहे. भारतासाठी विक्रमी 73 वे पदक नित्या श्रेने मिळवून दिले.

भारताच्या या शानदार कामगिरीचे कौतुक नरेंद्र मोदी यांनीही केले आहे. त्यांनी पोस्ट करत लिहिले की 'आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारताची अविस्मरणीय कामगिरी. भारताने 2018 आशियाई पॅरा क्रीडा जकार्ता स्पर्धेतील 72 पदकांच्या विक्रमाला मागे टाकत अभूतपूर्व 73 पदके जिंकली आहेत आणि अजूनही शानदार कामगिरी सुरु आहे.'

याबरोबर त्यांनी म्हटले आहे की या कामगिरीतून पुढच्या पिढीलाही प्रेरणा मिळेल.

दरम्यान भारताने आत्तापर्यंत (26 ऑक्टोबर, दुपारी 2 पर्यंत) 18 सुवर्ण पदके, 23 रौप्य पदके आणि 39 कांस्य पदके जिंकली आहेत.

भारताने सर्वाधिक पदके ऍथलेटिक्समध्ये जिंकली आहेत. भारताला ऍथलेटिक्समध्ये 45 पदके जिंकली आहेत. तसेच त्यापाठोपाठ बॅडमिंटनमध्ये 12 पदके जिंकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT