South Africa vs India, 1st ODI at Johannesburg:
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (17 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने एक मोठा विक्रमही केला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 117 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 2 विकेट्स गमावत 16.4 षटकात म्हणजेच अवघ्या 100 चेंडूतच सहज पूर्ण केला. त्यामुळे भारताने तब्बल 200 चेंडू राखून विजय मिळवला.
त्यामुळे वनडेत चेंडूंच्या तुलनेतील भारताचा हा चौथ्या क्रमांकाचा विजय ठरला. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सर्वात मोठा विजय ठरला.
याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील चेंडूंच्या तुलनेतील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभवही ठरला. यापूर्वी त्यांना नॉटिंगघममध्ये 2008 साली इंग्लंडने वनडे सामन्यांत 215 चेंडू राखून पराभूत केले होते.
263 चेंडू - विरुद्ध श्रीलंका, कोलंबो, 2023
231 चेंडू - विरुद्ध केनिया, ब्लोएमफाँटेन, 2001
211 चेंडू - विरुद्ध वेस्ट इंडिज, तिरुवनंतपुरम, 2018
200 चेंडू - विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, 2023
215 चेंडू - विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगघम, 2008
200 चेंडू - विरुद्ध भारत, जोहान्सबर्ग, 2023
188 चेंडू - विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2002
185 चेंडू - विरुद्ध भारत, 2022
या सामन्यात भारताकडून 117 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके केली. सुदर्शनने 43 चेंडूत नाबाद 55 धावांची खेळी केली. तसेच श्रेयस अय्यरने 45 चेंडूत 52 धावा केल्या. त्यामुळे भारताने 117 धावांचे आव्हान सहज पूर्ण केले.
तत्पुर्वी, भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि आवेश खानने दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज फार वेळ खेळपट्टीवर टिकणार नाहीत याची काळजी घेतली.
अर्शदीपने 10 षटकात 37 धावांत 5 विकेट्स घेतल्या. तसेच आवेशने 8 षटकात 27 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. या दोघांव्यतिरिक्त कुलदीप यादवने 1 विकेट घेतली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव 27.3 षटकात 116 धावांवर संपुष्टात आला.
दक्षिण आफ्रिकेकडून अँडिल फेहलुक्वायोने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली, तर टोनी डी झोर्झीने 28 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त अन्य कोणाला खास काही करता आले नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.