Team India
Team India Dainik Gomantak
क्रीडा

India Predicted XI vs ENG: दुसऱ्या वनडे मालिकेत टीम इंडियामध्ये झाला बदल, पहा इथे

दैनिक गोमन्तक

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने (Team India) इंग्लंडविरुद्ध (England) पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये (ENG vs IND) शानदार खेळी करत 10 गडी राखून विजय मिळवला आहे. जसप्रीत बुमराहने 6 बळी घेतले, तर रोहितने नाबाद अर्धशतक झळकावत संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवले आहे. कंबरेला ताण आल्याने विराट या सामन्यात खेळू शकणार नाहीये, असे ट्विट करून बीसीसीआयने ही माहिती दिली होती. दुसऱ्या सामन्यात भारताला त्यांच्या विजयी संयोजनामध्ये कोणतेही बदल करायला आवडणार नाही असेही यावेळी सांगण्यात आले आहे. (India Predicted XI vs ENG)

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनसाठीची टीम:

1 – रोहित शर्मा (कर्णधार): आपल्या संघाचे नेतृत्व करताना, त्याने पहिल्या सामन्यात 58 चेंडूत नाबाद 76 धावांची खेळी केली आणि 18.4 ओव्हरमध्ये 111 धावांचे लक्ष्य गाठण्यात तो सर्वात प्रभावी ठरला आहे.

2 – शिखर धवन: धवनने 54 चेंडूत नाबाद 31 धावा करताना रोहितला साथ देण्याचे काम केले आहे. एका फॉरमॅटमध्ये भारतीय संघात स्थान मिळविणाऱ्या शखरला आपला फॉर्म कायम ठेवायला आवडेल.

3 – श्रेयस अय्यर: विराट कोहलीच्या जागी अय्यरला संघात बोलावण्यात आले. मात्र, पहिल्या सामन्या दरम्यान अय्यरला फलंदाजीची संधी मिळाली नाही, तर श्रेयसला आणखी एक संधी मिळणार आहे.

4 – सूर्यकुमार यादव: इंग्लंडविरुद्ध टी-20 मध्ये शतक झळकावल्यापासून यादव उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. 2022 च्या टी20 विश्वचषकासाठी त्याच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

5 – ऋषभ पंत: पंतने पहिल्या एकदिवसीय सामन्यात तीन शानदार झेल घेऊन विकेटसाठी चांगली कामगिरी केली. जेव्हा त्याची बॅट खेळते तेव्हा ते पाहण्यासारखे असते.

6 – हार्दिक पांड्या: कुंग फू पांड्याने चार षटके टाकली आणि 22 धावा दिल्या पण त्याला यश मिळालेले नाही. बॅटनेही तो संघात संतुलन राखण्याचे काम करत असतो.

7 – रवींद्र जडेजा: जडेजाला फलंदाजीची संधी मिळाली ना गोलंदाजीची. हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू भारतीय वनडे संघाचा महत्त्वाचा भाग असला तरी देखील.

8 – जसप्रीत बुमराह: त्याने 19 धावांत 6 विकेट घेतल्या, ज्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील मिळाला आहे. बुमराह संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे.

9 – मोहम्मद शमी: वेगवान गोलंदाजाने चमकदार कामगिरी करत बेन स्टोक्स, जोस बटलर आणि क्रेग ओव्हरटन यांच्या विकेट घेतल्या आहेत. बुमराहला सपोर्ट करण्यासाठी तो परिपूर्ण आहे असे म्हणायला हरकत नाही.

10 - प्रसिद्ध कृष्णा: तो एक उत्कृष्ट डेक गोलंदाज आहे तर त्याने वेळोवेळी इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्याचे देखील काम केले आहे.

11 - युझवेंद्र चहल: युजीला फक्त दोन षटके टाकण्याची संधी मिळाली, आणि ज्यामध्ये 10 धावा झाल्या. मात्र, टी-20 मालिकेत त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. तर सध्याच्या फॉर्ममुळे तो टीम इंडियाचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT