क्रीडा

Asia Cup 2022: पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यापूर्वी काय म्हणाले, रोहित, राहुल आणि विराट

गोमन्तक डिजिटल टीम

भारताचा आशिया कप (Asia Cup 2022) मधील श्रीगणेशा उद्यापासून (28 ऑगस्ट) होत आहे. भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान सोबत होणार असून, या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दोन्ही टिममध्ये मोठा उत्साह आणि एनर्जी देखील पहायला मिळत आहे. T20 विश्वचषकात भारताला दहा गडी राखून मात दिल्याने पाकिस्तानचा आत्मविश्वास सध्या सातव्या आस्मानावर आहे. पण, भारतीय टिम देखील पूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे.

भारत-पाकिस्तान (India Pakistan) सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. रोहित शर्मा म्हणाला, आशिया कप ही एक वेगळी स्पर्धा आहे, नवीन स्पर्धा आहे. त्यामुळे आम्ही नव्याने या स्पर्धेसाठी तयार झालो आहोत. पाकिस्तान विरूद्ध खेळणं आव्हानात्मक असणार आहे. पण, टिम म्हणून आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ सादर करू. आम्ही एक लक्ष्य ठेवून आलो आहोत, आणि ते यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.

के. एल. रोहुल म्हणाला की, भारत-पाकिस्तान विरूद्धचे सामने नेहमीच उत्सुकतेने भरलेले असतात. पाकिस्तान विरूद्ध खेळणे आव्हानात्मक असेल. त्यामुळे आम्ही देखील त्यापद्धतीने तयारी केली आहे. या सामन्याची दोन्ही बाजूकडे अनेक अपेक्षा ठेवून लोक बसलेले असतात.

विराट कोहली आपल्या खराब फॉर्मबद्दल बोलताना असे म्हणाला की, मागील काही काळ मला काही अडचणी येत होत्या. क्रिकेट माझ्यासाठी नेहमीच खास आणि महत्वाचे राहिले आहे. असे कोहली म्हणाला.

आशिया चषकातील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर होणार आहे. तसेच डिझ्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हे सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro Ro Ferryboat: गोव्यात आणखी एका मार्गावर होणार 'रो रो फेरी' सुरु, किती असणार क्षमता? कधी होणार सुरु? जाणून घ्या..

''बान तू सायबा'', भूतनाथाला रानातून परत आणण्यासाठी भाविक जमणार; पेडण्यात भरणार 'पुनव उत्सव'

U19 Goa Cricket Team: गोवा संघाचा लागणार कस! विनू मांकड करंडक होणार सुरु; युवा क्रिकेटपटू चमक दाखवण्यासाठी सज्ज

Mapusa Market: पोर्तुगीज काळात उभारलेला, 1960 साली बांधलेला, आशियातील पहिला नियोजनबद्ध बाजार

IIT Project Goa: उद्या गोव्याच्या हातून 'आयआयटी' गेली तर..?

SCROLL FOR NEXT