Team India 
क्रीडा

IND vs BAN: सलामीवीरांचा अर्धशतकी तडाखा, तरी भारतानं बांगलादेशला 256 धावांत रोखलं

World Cup 2023: बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 257 धावांचे आव्हान ठेवले आहे.

Pranali Kodre

India need 257 runs to win against Bangladesh in ICC ODI Cricket World Cup 2023:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध बांगलादेश सामना गुरुवारी (19 ऑक्टोबर) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 257 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 256 धावा केल्या. बांगलादेशकडून सलामीवीर तान्झिद हसन आणि लिटन दास यांनी अर्धशतके केली. तसेच भारताकडून रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशकडून तान्झिद हसन आणि लिटन दास सलामीला फलंदाजी करताना चांगली सुरुवात दिली होती.

या दोघांनीही फटकेबाजी करत शतकी भागीदारीकडे वाटचाल केली होती. तान्झिदने आक्रमक खेळताना अर्धशतकही पूर्ण केले. मात्र, अखेर त्यांची जोडी तोडण्यात कुलदीप यादवला यश मिळाले.

कुलदीपने तान्झिदला 15 व्या षटकात बाद केले. तान्झिदने 43 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. दरम्यान, तान्झिद आणि लिटन दास यांच्यात सलामीला 93 धावांची भागीदारी केली. तान्झिद बाद झाल्यानंतरही लिटन दासने आपली लय कायम ठेवली आणि अर्धशतक केले.

मात्र 20 व्या षटकात कर्णधार नजमुल हुसैन शान्तोला रविंद्र जडेजाने 8 धावांवर पायचीत केले, तर 25 व्या षटकात मेहदी हसन मिराजला 3 धावांवर मोहम्मद सिराजने बाद केले, त्याचा शानदार झेल केएल राहुलने घेतला.

त्यापाठोपाठ लिटन दासही 28 व्या षटकात रविंद्र जडेजाविरुद्ध खेळताना शुभमन गिलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. लिटन दासने 82 चेंडूत 7 चौकारांसह 66 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशला चांगली सुरुवात मिळूनही त्यांची धावगती मंदावली.

दरम्यान, नंतर तौहिद हृदोय आणि मुश्फिकुर रहिम यांनी डाव सावरला होता. त्यांच्यात 42 धावांची भागीदारीही झाली. पण ही भागीदारी आणखी धोकादायक ठरण्यापूर्वीच हृदोयला शार्दुल ठाकूरने 16 धावांवर माघारी धाडले, तर जसप्रीत बुमराहने मुश्फिकुर रहिमला रविंद्र जडेजाच्या हातून झेलबाद केले.

यानंतरही महमुद्दुलाह आणि नसूम अहमद यांनी झुंज दिली. मात्र, नसूमला 14 धावांवर सिराजने बाद केले, तर महमुद्दुलाह 46 धावांवर बुमराहच्या गोलंदाजीवर अखेरच्या षटकात त्रिफळाचीत झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT