U19 Team India | U19 World Cup 2024 X/BCCI
क्रीडा

U19 World Cup: विश्वविजयासाठी भारतासमोर ऑस्ट्रेलियाने ठेवलं विक्रमी लक्ष्य! फायनलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

U19 World Cup, India vs Australia Final: 19 वर्षांखालील वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विक्रमी 254 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Pranali Kodre

ICC U19 Men’s Cricket World Cup 2024 Final, India vs Australia

भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे युवा संघ रविवारी (11 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने आले आहेत. बेनोनीला होत असलेल्या या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयासाठी भारतासमोर 254 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

19 वर्षांखालील वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात एखाद्या संघाने 250 धावांचा टप्पा पार करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यापूर्वी कोणत्याच संघाने अंतिम सामन्यात अडीचशेचा टप्पा पार केला नव्हता.

त्यामुळे आता भारताला सहाव्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्डकपवर नाव कोरायचे असेल, तर त्यांना 254 धावांचे विक्रमी लक्ष्य पार करून नवा इतिहास रचावा लागणार आहे.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का राज लिंबानीने सुरुवातीलाच दिला. त्याने सॅम कोन्स्टासला तिसऱ्या षटकात शुन्यावरच बाद केले.

मात्र त्यानंतर सलामीवीर हॅरी डिक्सनला साथीला घेत कर्णधार ह्यू वेबगेनने डाव सावरला. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

अखेर भारताचा कर्णधार उदय सहारनने गोलंदाजीत बदल करत नमन तिवारीकडे चेंडू सोपवला. हा बदल फायदेशीर ठरला. त्यांची धोकादायक ठरणारी भागीदारी नमन तिवारीने तोडली. त्याने वेबगेनला 48 धावांवर माघारी धाडले. मुशीरने त्याचा शानदार झेल घेतला.

काहीवेळात डिक्सनलाही 42 धावांवर नमननेच बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दोन मोठे धक्के बसले होते. मात्र, पुन्हा एकदा हरजस सिंग आणि रायन हिक्स यांनी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला दिडशे धावा पार करून दिल्या.

त्यांची भागीदारी रंगत असतानाच हिक्सला राज लिंबानीने पायचीत पकडले. त्यामुळे त्याची हरजसबरोबरची 66 धावांची भागीदारी तुटली. हिक्स 20 धावांवर बाद झाला.

मात्र, हरजसने आपला खेळ कायम ठेवत अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र, त्यालाही अर्धशतकानंतर सौम्य पांडेने पायचीत केले.

हरजसने 64 चेंडूत 55 धावांची खेळी केली. पाठोपाठ राफ मॅकमिलन आणि चार्ली अँडरसन स्वस्तात बाद झाले. मात्र ऑलिव्हर पीकने ऑस्ट्रेलिया अडीचशेचा टप्पा पार करेल, याची काळली घेतली. त्याने 43 चेंडूत 46 धावांची नाबाद खेळी केली. त्याने डावाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाला 253 धावांपर्यंत पोहचवले.

या सामन्यात भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच नमन तिवारीने 2 विकेट्स घेतल्या, तर सौम्य तिवारी आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT