Olympic
Olympic Dainik Gomantak
क्रीडा

Olympics 2036चं भारतात होणार आयोजन? रशिया मदत करण्यास तयार

दैनिक गोमन्तक

भारताला 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळू शकते. 2036 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्यास भारताला मदत करेल असे रशियाला सांगण्यात आले आहे. भारताला 2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाल्यास प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धा भारतात होणार. युक्रेनच्या आक्रमणानंतर रशियाला क्रीडा जगतापासून जागतिक स्तरावर हद्दपार करण्यात आले आहे. (Olympics 2036)

अशा परिस्थितीत रशिया भारताला मदत करण्यास तयार आहे. मात्र 2036 च्या ऑलिम्पिकचे यजमानपद कोणाला द्यायचे याचा अंतिम निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती घेईल. या संदर्भात कोणतीही ठोस अधिकृत पावले उचलली गेली नसताना, 2036 च्या खेळांचे आयोजन अहमदाबादमध्ये करण्याची इच्छा भारताने वारंवार व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षी, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी केंद्रस्थानी अहमदाबादसह जवळपासच्या शहरांमध्ये ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी एक अनोखी बोली प्रस्तावित केली होती. दोन महिन्यांपूर्वी गुजरातचे महाधिवक्ता कमल त्रिवेदी यांनी गुजरात उच्च न्यायालयात सांगितले की, "आम्ही 2036 च्या ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहोत आणि ऑलिम्पिक समिती 2025 मध्ये येथे भेट देईल". नरेंद्र मोदी स्टेडियमच्या उद्घाटनावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही हे कॉम्प्लेक्स ऑलिम्पिकचे आयोजन करण्यास सक्षम असल्याचे सांगितले होते.

भारत दौऱ्यावर असताना, मॅटिसिन यांनी एका मीडिया हाऊसला सांगितले की, "भारत ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यास उत्सुक आहे याचा रशियाला खूप आनंद आहे. ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यासारखे स्वप्न सत्यात उतरले तर देशाच्या स्थिर विकासाचा तो आणखी एक निकष ठरेल. आम्ही नेहमी संवादासाठी हजर आहोत आणि ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याचा आमचा अनुभव शेअर करण्यास तयार आहोत, जर निर्णय घेतला गेला तर रशियन तज्ञ भारतात ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यास मदत करतील भारताला मदत करण्यास आम्हाला आनंद होईल."

मॅटिसिनने जागतिक फुटबॉल क्रमवारीत 35व्या क्रमांकावर असलेल्या रशिया आणि 108व्या क्रमांकावर असलेल्या भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्याचाही प्रस्ताव ठेवला होता. या संबधी IOC निर्णय घेईल. क्रोएशियाच्या माजी अध्यक्ष कोलिंडा ग्रॅबर-किटारोविक या IOC आयोगाच्या प्रमुख आहेत जे 2036 गेम्ससाठी यजमान शहर निवडतील. 2025 ते 2029 दरम्यान त्याची निवड केली जाईल. 2036 च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी स्वारस्य दाखवणाऱ्या देशांपैकी रशिया एक होता. मात्र, युक्रेनच्या आक्रमणानंतर रशियाने या शर्यतीतून माघार घेतली. आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांनी रशियामध्ये 2022-2023 या कालावधीत 36 प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसह 186 आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलल्या आहेत.

ही शहरे स्पर्धेच्या रांगेत

लंडनचे महापौर सादिक खान यांनी सांगितले की, लंडनमध्ये ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीशी चर्चा सुरू आहे. लंडन व्यतिरिक्त, इस्तंबूल, दोहा, जकार्ता, कैरो, बर्लिन आणि तेल अवीव देखील ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याचा दावा करू शकतात. 2024 आणि 2032 च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारताने आपले मत सादर केले होते, परंतु आजपर्यंत भारताला ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्याची संधी मिळालेली नाही. पुढील तीन ऑलिम्पिकचे यजमान आधीच ठरलेले आहेत - 2024 मध्ये पॅरिस, 2028 मध्ये लॉस एंजेलिस आणि 2032 मध्ये ब्रिस्बेन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT