IND vs WI Dainik Gomantak
क्रीडा

IND vs WI: भारत अन् वेस्ट इंडिजच्या ODI-T20 मालिकेतील वेळापत्रकात झाला बदल

भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात पुढील महिन्यात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

दैनिक गोमन्तक

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पुढील महिन्यात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. बीसीसीआयने एका घोषणेमध्ये म्हटले आहे की, मालिकेतील सर्व 6 सामने फक्त अहमदाबाद आणि कोलकातामध्ये (Kolkata) खेळवले जातील. भारतीय बोर्डाने शनिवारी 22 जानेवारी रोजी एक निवेदन जारी केले की, बायो बबल मजबूत ठेवण्यासाठी मालिकेच्या सामन्यांचे ठिकाण 6 वरुन फक्त 2 करण्यात आले आहे. सध्या देशात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दररोज जवळपास तीन लाखांहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. ज्यामध्ये ओमिक्रॉनची व्हेरिएंटची लागण झालेल्यांची संख्या अधिक आहे. (India Has Rescheduled The ODI T20 Series Between The West Indies)

दरम्यान, वेस्ट इंडिजचा (West Indies) संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध (England) टी-20 मालिका खेळणार आहे, त्यानंतर संघ जानेवारीच्या अखेरीस भारतात पोहोचेल. या दौऱ्याची सुरुवात 6 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. यानंतर 16 फेब्रुवारीपासून कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT