Sachin Tendulkar | Yuvraj Singh Dainik Gomantak
क्रीडा

Sachin Tendulkar: कशी होती मास्टर-ब्लास्टरबरोबर पहिली भेट? युवीने दिला आठणींना उजाळा

युवराज सिंगने सचिन तेंडुलकरबद्दल अनेक आठवणी सांगतल्या असून त्यांच्या खास भागीदारीबद्दलही खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Yuvraj Singh remembers first meeting with Sachin Tendulkar: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. तो केवळ एक महान फलंदाजच नाही, तर एमएस धोनी, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, युवराज सिंग अशा अनेक क्रिकेटपटूंसाठी आदर्श देखील आहे. आता सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून 10 वर्षेही झाले आहेत. सचिन येत्या सोमवारी (24 एप्रिल) त्याचा 50 वा वाढदिवसही साजरा करणार आहे.

पण त्यापूर्वी भारताचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगने त्याच्या आयुष्यात सचिनचे किती महत्त्व आहे हे सांगितले आहे. त्याने त्याला देवदूतही म्हटले आहे. सचिन आणि युवराज यांनी काही वर्षे भारताकडून एकत्र क्रिकेटही खेळले आहे.

तसेच 2011 वनडे वर्ल्डकप जिंकलेल्या भारतीय संघातही सचिन आणि युवराज यांचे योगदान महत्त्वाचे होते. त्या वर्ल्डकपमध्ये कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांचा सामनाही युवराज करत होता. पण त्यावेळी सचिनने नेहमीच त्याची काळजी घेतल्याचेही युवराजने सांगितले आहे.

सचिन देवदूतासारखाच...

पीटीआयशी बोलताना युवराज म्हणाला, 'जेव्हा मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो, तेव्हा आमच्याकडे प्रशिक्षक होते. पण जेव्हाही मला फलंदाजीत तांत्रिक अडचण यायची, तेव्हा सचिन माझ्यासाठी हक्काचा व्यक्ती होता. तो मला उपाय सांगायचा.'

'तो फक्त माझ्यासाठी लहानपणीचा हिरो नव्हता, तर 22 यार्डच्या पलिकडेही तो माझ्यासाठी देवदूत होता. जेव्हाही मी आयुष्यात कोणत्याही वैयक्तिक संकटाचा किंवा दुविधाचा सामना केला असेल, तेव्हा मी पहिल्यांदा संपर्क केलेल्या व्यक्तींमध्ये सचिन पाजी असेल. त्यानेही मला नेहमीच जीवनातीव सर्वोत्तम धडे आणि सल्ले दिले आहेत.'

तसेच युवराजने 2011 वर्ल्डकपवेळी त्याला खोकल्याचा आणि उलटीचा त्रास होत असताना झोप लागत नसायची, तेव्हा सचिन त्याची काळजी घेत असल्याचेही सांगितले. युवराज म्हणाला, 'मलाही माहित नव्हते की तो कर्करोग होता. सचिन नेहमी माझी विचारपूस करायचा. माझ्यावर अमेरिकेमध्ये उपचार सुरू असतानाही तो माझ्या तब्येतीबद्दल काळजीपूर्वक विचारपूस करायचा.'

युवी - सचिनची पहिली भेट

युवराजने त्याची सचिनशी पहिली भेट कशी झाली हे देखील सांगितले. तो म्हणाला, 'मला वाटते सचिनने नुकतेच भारतासाठी खेळणे सुरू केले होते आणि तो नावारुपाला येत होता. तेव्हा कपिल पाजी मला सचिनकडे घेऊन गेले होते. मी त्याच्याशी पहिल्यांदा हात मिळवला होता.'

आवडती भागीदारी...

याशिवाय सचिनबरोबरची सर्वात आवडत्या भागीदारीबद्दल बोलताना युवराज म्हणाला, 'जर तुम्ही आकडे पाहिलेत, तर सचिन आणि मी वनडेत खूप मोठ्या भागीदाऱ्या केलेल्या नाही. कारण तो बऱ्याचदा सलामीला खेळायचा आणि मी माझ्या कारकिर्दीत बराच काळ ६ व्या क्रमांकावर खेळलो.'

'पण कसोटी क्रिकेटमध्ये आम्ही चेन्नईमध्ये डिसेंबर 2008 मध्ये इंग्लंडविरुद्ध 150 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली होती. तेव्हा आम्ही 387 धावांचा पाठलाग करत होतो आणि आम्ही तो सामना जिंकलो होते. सचिनने शतक केले होते आणि 80च्या आसपास धावा केलेल्या. पण ती कसोटी खास होती कारण मुंबईत 26/11 चा हल्ला झाल्यानंतरची तो पहिलाच सामना होता.'

'देश दु:खाचा सामना करत होता आणि अनेक निष्पाप जीव गमावल्यामुळे आम्ही सर्व खूप भावूक झालेलो होतो. सचिन, तर मुंबईचा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हे अधिक भावनिक होते. पण आमची भागीदारी पाचव्या दिवशी झली होती आणि 400 च्या आसपासच्या आव्हानाचा आम्ही पाठलाग करत होतो. त्यामुळे ती भागीदारी खास होती. जेव्हा आम्ही जिंकलो, तेव्हा मी सचिनला उचलले होते.'

सचिनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक धावा, सर्वाधिक सामने आणि सर्वाधिक शतके करण्याचाही विक्रम केला आहे. सचिनने 664 सामने खेळताना 48.52 च्या सरासरीने 34357 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 100 शतकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT