Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: रोहितच्या झंझावातापुढे अफगाणिस्तान ढेर, भारताने नोंदवला दणदणीत विजय!

Rohit Sharma: भारतविरुद्ध अफगाणिस्तान ICC क्रिकेट विश्वचषक 2023 चा 9 वा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला.

Manish Jadhav

World Cup 2023: भारतविरुद्ध अफगाणिस्तान ICC क्रिकेट विश्वचषक 2023 चा 9 वा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला उमरझाई यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 50 षटकांत 8 गडी गमावून 272 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानकडून कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने सर्वाधिक 80 धावा केल्या.

प्रत्युत्तरात रोहित शर्माच्या झंझावाती शतकाच्या जोरावर भारताने विजयाचा झेंडा फडकावला. भारताने 35 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. रोहितने 84 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांसह 131 धावा केल्या.

त्याने इशान किशन (47 चेंडूत 47, पाच चौकार, दोन षटकार) सोबत पहिल्या विकेटसाठी 156 धावांची भागीदारी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने 39 धावांत 4 बळी घेतले.

हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 43 धावांत 2 बळी घेतले. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

दरम्यान, भारताला पहिला झटका 19 व्या षटकात इशानच्या रुपाने बसला. त्याला राशीद खानने इब्राहिम झद्रानच्या हाती झेलबाद केले. त्याचवेळी, 26 व्या षटकात राशीदने रोहितला बोल्ड केले.

रोहितने विराट कोहलीसोबत (Virat Kohli) दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. यानंतर कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 68 धावांची अभेद्य भागीदारी केली.

कोहलीने 56 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर अय्यरने 23 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला.

दुसरीकडे, सलामीवीर इब्राहिम झद्रान आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी अफगाणिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली, मात्र सातव्या षटकात जसप्रीत बुमराहने ही भागीदारी मोडून काढत इब्राहिम झद्रानला (22) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

सिराजनेही आपला जलवा दाखवून दिली. हार्दिक पांड्याने रहमानउल्ला गुरबाजला बाद केले. गुरबाजने 28 चेंडूत 21 धावा केल्या. शार्दुल ठाकूरने रहमतला एलबीडब्ल्यू केले.

हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला उमरझाई यांच्यात चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. मात्र, उमरझाई 69 चेंडूत 62 धावा करुन बाद झाला. हशमतुल्ला शाहिदीला कुलदीप यादवने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याने 88 चेंडूत 80 धावा केल्या.

मोहम्मद नबीला 18 धावांवर बुमराहने एलबीडब्ल्यू केले. बुमराहने नजीबुल्ला झद्रानला दोन धावांवर कोहलीकरवी झेलबाद केले. 49व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बुमराहने राशीद खानला 16 धावांवर कुलदीपकरवी झेलबाद केले.

मुजीब उर रहमान 10 धावांवर नाबाद राहिला तर नवीन उल हक 9 धावा करुन नाबाद राहिला. अफगाणिस्तानला 50 षटकांत आठ गडी गमावून 272 धावा करता आल्या.

कोहलीने बॅक टू बॅक अर्धशतके झळकावली

रोहित आणि इशान बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात आला. कोहलीने मागील सामन्यातही अर्धशतकी खेळी केली होती. यानंतर आज पुन्हा एकदा त्याने अर्धशतक झळकावले.

आजच्या सामन्यात कोहलीने 56 चेंडूत 55 धावांची खेळी केली आहे. या खेळीत कोहलीने 6 चौकारही मारले. याशिवाय, श्रेयस अय्यरनेही शेवटच्या क्षणी कोहलीला चांगली साथ दिली आणि 23 चेंडूत 25 धावांची खेळी खेळली.

अशा प्रकारे भारताने हा सामना सहज जिंकला आहे. जेव्हापासून भारतीय फलंदाज मैदानात उतरले तेव्हापासून भारताचा सामना अफगाणिस्तानच्या बाजूने झुकल्याचे एकदाही वाटले नाही. अशा प्रकारे भारताने एकतर्फी लढत जिंकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT