Tilak Varma Dainik Gomantak
क्रीडा

Tilak Varma: तिलकचा जिगरी दोस्ताला द. आफ्रिका संघात निवड होताच स्पेशल व्हिडिओ कॉल...

South Africa Squad: दक्षिण आफ्रिका संघाची आगामी वनडे आणि टी20 मालिकेसाठी निवड झाली असून यात पहिल्यांदाच तिलक वर्माच्या जवळच्या मित्राचीही निवड झाली आहे.

Pranali Kodre

Tilak Varma Congratulates Dewald Brevis on Maiden South Africa Call-up:

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वनडे आणि टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या दोन्ही मालिकांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात पहिल्यांदाच डेवाल्ड ब्रेविसचा समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाचे म्हणजे भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकपपूर्वी ब्रेविसचा दक्षिण आफ्रिका संघात समावेश झाल्याने त्यादृष्टीने ही मोठी गोष्ट मानली जात आहे. त्याचमुळे त्याचे खास अभिनंदन त्याचा जवळचा मित्र तिलक वर्माने केले आहे.

Dewald Brevis

तिलक आणि ब्रेविस हे दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळतात. त्यामुळे त्यांच्यात घट्ट मैत्री आहे. त्याचमुळे ब्रेविसला पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात संधी मिळाल्याबद्दल तिलकने त्याला व्हिडिओ कॉल केला होता.

याचा फोटोही तिलकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीला त्यांच्या व्हिडिओ कॉलचा फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोला कॅप्शन दिले आहे की 'पहिल्यांदाच निवड झाल्याबद्दल अभिनंदन भावा. तुझ्यासाठी खूप आनंदी आहे आणि तुझा अभिमान वाटत आहे.'

दरम्यान, ब्रेविस हा दक्षिण आफ्रिकेचा भविष्यातील स्टार खेळाडू समजला जातो. त्याला एबी डिविलियर्सचा वारसदारही समजले जाते.

ब्रेविसनेही केले होते तिलकचे अभिनंदन

तिलकनेही काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या टी20 मालिकेतच सर्वांना प्रभावित केले.

दरम्यान, पहिल्याच सामन्यात त्याने 22 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 39 धावांची खेळी केली. ही खेळी करताना दुसऱ्या आणि तिसऱ्याच चेंडूवर त्याने सलग दोन षटकार मारले होते.

त्याच्या या कामगिरीनंतर ब्रेविसने त्याच्यासाठी व्हिडिओ मेसेज दिला होता. ज्यात त्याने तिलकचे अभिनंदन केले होते, तसेच त्याचे कौतुकही केले होते. याशिवाय त्याच्या कुटुंबाकडूनही त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा

दक्षिण आफ्रिकेला मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 टी20 आणि 5 वनडे सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. टी20 मालिका 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान होईल, तर वनडे मालिका 7 ते 17 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

असे आहेत दक्षिण आफ्रिका संघ -

  • वनडे संघ - तेंम्बा बावुमा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेव्हिस, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फॉर्च्युइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सिन, हेन्रिक क्लासेन, सिसांडा मॅगाला, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, एन्रिक नॉर्किया, ताब्राईज शम्सी, वेन पार्नेल, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि रस्सी वॅन डर द्युसेन.

  • टी20 संघ - एडन मार्कराम (कर्णधार), तेम्बा बावुमा, मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, ब्योर्न फॉर्च्युइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सिन, सिसांडा मगला, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, ताब्राईज शम्सी,, ट्रिस्टन विल्यम्स, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाड विलियम्स आणि रस्सी वॅन डर द्युसेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT