Team India BCCI
क्रीडा

IND vs AUS: रायपूरमध्ये भारताने रचला इतिहास! पाकिस्तानला मागे टाकत बनला T20 मधील सर्वात यशस्वी संघ

India vs Australia: रायपूरमध्ये झालेल्या टी20 सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. भारतासाठी हा विजय विश्वविक्रमी ठरला.

Pranali Kodre

India vs Australia, 4th T20I Match at Raipur, Record:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी (1 डिसेंबर) रायपूरला पार पडला, ज्यात भारताने २० धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबर मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. भारतीय संघासाठी हा विक्रम विश्वविक्रमीही ठरला आहे.

भारतीय संघासाठी हा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील 136 वा विजय ठरला आहे. त्यामुळे भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा संघ ठरला. भारताने हा पराक्रम करताना पाकिस्तानच्या 135 विजयांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताने आत्तापर्यंत 213 सामने खेळले असून 136 सामने जिंकले आहेत, तसेच 67 सामने पराभूत झाले आहेत. तसेच 4 सामने बरोबरीत सुटले असून ६ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

पाकिस्तानने 226 आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून 135 सामने जिंकले आहे. तसेच 82 सामने पराभूत झाले आहेत. त्यांचे 3 सामने बरोबरीत सुटले असून 6 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून त्यांनी 200 टी20 सामन्यांमधील 102 सामन्यांत विजय मिळवले आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या तीन संघांनाच 100 हून अधिक विजय मिळवता आले आहेत.

  • आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ (आकडेवारी 1 डिसेंबर 2023 पर्यंत) -

    • 136 विजय - भारत (213 सामने)

    • 135 विजय - पाकिस्तान (226 सामने)

    • 102 विजय - न्यूझीलंड (200 सामने)

    • 95 विजय - दक्षिण आफ्रिका (171 सामने)

    • 95 विजय - ऑस्ट्रेलिया (181 सामने)

    • 92 विजय - इंग्लंड (177 सामने)

भारताचा विजय

शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 174 धावा केल्या. भारताकडून रिंकू सिंगने सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. तसेच यशस्वी जयस्वालने 37 धावा, जितेश शर्माने 35 धावा आणि ऋतुराज गायकवाडने 31 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वारशुईने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

भारताने दिलेल्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 बाद 154 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक 36 धावांची नाबाद खेळी केली. तसेच ट्रेविस हेडने 31 धावांची खेळी केली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT