Ind vs Aus T20 WC Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs Aus T20 WC: सराव सामन्यात भारताकडून कांगारू पराभूत, शमीने मैदान मारले

शमी अखेरचे षटक टाकण्यासाठी आला आणि विजयाचा शिल्पकार ठरला.

गोमन्तक डिजिटल टीम

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज T20 विश्वचषकापूर्वीचा सराव सामना पार पडला. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने सहा धावा राखून ऑस्ट्रेलियाचा पराजय केला. अखेरच्या षटकात भारतानं विजय ऑस्ट्रेलियाकडून खेचून आणला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे सामन्यात नसणारा मोहम्मद शमी. शमी अखेरचे षटक टाकण्यासाठी आला आणि विजयाचा शिल्पकार ठरला.

दिल्यानंतर अखेरच्या चारही चेंडूत गडी बाद केले. यातील एक विकेट रनआऊट असल्यानं शमीची हॅट्रीक हुकली पण त्यानं केलेल्या कमाल कामगिरीची चर्चा सर्वत्र सुरु आहे. नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर केएल आणि रोहितनं चांगली सुरुवात केली. 15 धावा करुन कर्णधार रोहित बाद झाला. त्यानंतर आलेल्या कोहली देखील 15 धावा करुन तंबूत परतला. केएल राहुल आणि सूर्या दोघांनी अर्धशतकं झळकावत अनुक्रमे 57 आणि 50 धावा केल्या. दिनेश कार्तिकने 20 धावांची खेळी करत भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचवली.

भारताने विजयासाठी दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर मिचेल मार्श आणि आरॉन फिंच यांनी चांगली सुरुवात केली. 35 धावा करुन मार्श बाद झाला. फिंचने 54 चेंडूत 76 धावा केल्या पण, त्यानंतर कुणालाही चांगली कामगिरी करता आली नाही.

भारताकडून सर्वाधिक तीन बळी शमीने घेतले, भुवनेश्वर कुमार दोन, सिंह, पटेल आणि चहल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT