Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: चौथ्या T20 सामन्यासाठी टीम इंडिया रायपूरमध्ये दाखल, जाणून घ्या मैदानावरील रेकॉर्ड!

IND vs AUS 4th T20I Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना 1 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

Manish Jadhav

IND vs AUS 4th T20I Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना 1 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना रायपूर शहरातील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. मात्र मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत हा सामना खूपच रोमांचक होणार आहे.

चौथ्या टी20 साठी दोन्ही संघ रायपूरला पोहोचले

दरम्यान, भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या सामन्यासाठी दोन्ही संघ रायपूरला पोहोचले आहेत. रायपूरमध्ये पोहोचलेल्या खेळाडूंचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही संघांचे खेळाडू विमानतळाबाहेर पडताना दिसत आहेत. श्रेयस अय्यरचाही मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तो उपकर्णधार म्हणून शेवटच्या 2 सामन्यांचा भाग असेल.

शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवरील रेकॉर्ड

शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आतापर्यंत फक्त 1 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला आहे. हा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. हा सामना या वर्षाच्या सुरुवातीला खेळला गेला होता, ज्यामध्ये न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना 108 धावांवर सर्वबाद झाला होता. त्याचवेळी, टीम इंडियाने (Team India) हे लक्ष्य 2 गडी गमावून गाठले होते. अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा सामना हा या मैदानावरील पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना असेल.

T20 मालिकेसाठी भारतीय संघ:

ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आर. प्रसीद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT