India vs Australia | U19 World Cup 2024 Final | Uday Saharan and Hugh Weibgen  X/IC
क्रीडा

U19 World Cup: अपराजित भारत-ऑस्ट्रेलिया जगज्जेते पदासाठी लढणार! असा राहिलाय फायनलपर्यंतचा प्रवास

U19 World Cup, India vs Australia: 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया युवा संघांचा प्रवास कसा राहिला, याचा थोडक्यात घेतलेला आढावा.

Pranali Kodre

ICC U19 Men’s Cricket World Cup 2024 Final, India vs Australia, Path to Final:

भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे युवा संघ रविवारी दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने येणार आहेत. बेनोनीला होणाऱ्या या अंतिम सामन्यात दोन्ही संघ विश्वविजेतेपदासाठी एकमेकांना आव्हान देतील.

दरम्यान, आत्तापर्यंत दोन्ही संघ अपराजित राहिले आहेत. दोन्ही संघांनी साखळी फेरी, सुपर सिक्स आणि उपांत्य फेरीत विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.

भारताचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास

भारताचे साखळी फेरीतील आणि सुपर सिक्समधील सामने ब्लोएमफाँटेनमध्ये झाले. भारताचा सर्वात पहिला सामना झाला बांगलादेशविरुद्ध. या सामन्यात भारताने 84 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसरा सामना भारताने आयर्लंडविरुद्ध झाला होता. या सामन्यात भारताने 201 धावांनी विजय मिळवलेला.

तसेच तिसरा सामना अमेरिकेच्या संघाविरुद्ध झाला. हा सामनाही भारताने 201 धावांनीच जिंकला. त्यामुळे साखळी फेरीतील तिन्ही सामन्यातील विजयासह भारताने सुपर सिक्समध्ये प्रवेश केला.

सुपर सिक्समध्ये भारताने न्यूझीलंडला 214 धावांनी पराभूत केले, त्यानंतर भारताने नेपाळला 132 धावांनी पराभूत केले. या विजयांसह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अटीतटीच्या झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने 2 विकेट्सने विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास

ऑस्ट्रेलियाचे साखळी फेरीतील आणि सुपर सिक्समधील सामने किम्बर्लीमध्ये झाले होते. ऑस्ट्रेलियाचा सर्वात पहिला सामना नामिबियाविरुद्ध झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 4 विकेट्सने विजय मिळवला.

त्यानंतर दुसरा सामना झिम्बाब्वेविरुद्ध झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 225 धावांनी विजय मिळवला. तिसरा सामना ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेविरुद्ध झाला. या सामन्यात 6 विकेट्सने ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या सलग 3 विजयांसह सुपर सिक्समध्ये प्रवेश केला.

सुपर सिक्समध्ये ऑस्ट्रेलियाने आधी इंग्लंडला डकवर्थ लुईस नियमानुसार 110 धावांनी पराभूत केले. मात्र सुपर सिक्समधील ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र आधीच्या विजयांमुळे ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध 1 विकेटने रोमांचक विजय मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT