Pranali Kodre
दक्षिण आफ्रिकेत सध्या 15 वा 19 वर्षांखालील मुलांचा वनडे वर्ल्डकप 2024 होत आहे. 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान हा सामना होत आहे.
यंदा 19 वर्षांखालील भारतीय मुलांचा संघ सहाव्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरला आहे.
यापूर्वी भारताच्या युवा संघाने सर्वाधिक 5 वेळा मुलांचा 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकप जिंकला आहे.
भारतीय युवा संघाने सर्वात महिल्यांदा 2000 साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकप जिंकला होता.
त्यानंतर 2008 साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा नाव कोरले.
भारतीय युवा संघाने तिसऱ्यांदा 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकपवर 2012 साली उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली खेळताना नाव कोरले.
पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या भारतीय युवा संघाने 2018 साली 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकप जिंकण्याचा पराक्रम केला.
भारतीय युवा संघाने यश धूलच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये पाचव्यांदा 19 वर्षांखालील वनडे वर्ल्डकप विजेतेपदाला गवसणी घातली.