Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND VS ZIM: टीम इंडियाने केला अनोखा रेकॉर्ड, जाणून घ्या

Team India: तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

दैनिक गोमन्तक

IND VS ZIM: टीम इंडियाने आज झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला. यासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. झिम्बाब्वेने पहिल्यांदा फलंदाजी करत 189 धावा काढल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने 30.5 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला.

दरम्यान, गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी शानदार फलंदाजी केली. गिलने नाबाद 82 तर धवनने नाबाद 81 धावा केल्या. याआधी, अक्षर पटेल, प्रसिध्द कृष्णा आणि दीपक चहर यांनी गोलंदाजीत प्रत्येकी तीन बळी घेतले होते. त्याचबरोबर या विजयासह केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली भारतीय संघाने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

झिम्बाब्वेला सलग 13व्या एकदिवसीय सामन्यात पराभूत केले

हरारे येथे आज झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या विजयासह केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वास्तविक, भारतीय संघाने झिम्बाब्वेला एकदिवसीय क्रिकेटमधील सलग 13व्या सामन्यात पराभूत केले आहे. 2013 ते 2022 पर्यंत झिम्बाब्वेने (Zimbabwe) भारताविरुद्ध एकही वनडे सामना जिंकलेला नाही. 2013 पूर्वीही भारताने 2002-05 दरम्यान सलग 10 सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचा पराभव केला होता.

झिम्बाब्वे व्यतिरिक्त, 1988-2004 दरम्यान, भारतीय संघाने बांगलादेशचा सलग 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभव केला. 1986-1988 पर्यंत भारताने सलग 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला होता. भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील उर्वरित 2 सामने जिंकल्यास ही अजिंक्य आघाडी 13 वरुन 15 पर्यंत वाढेल.

धवनने 6500 धावा पूर्ण केल्या

झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना शिखर धवनसाठीही खूप खास आहे. आज धवनने भारतासाठी वनडेमधले 38 वे अर्धशतक झळकावले. धवनने आज एकदिवसीय कारकिर्दीत 6500 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा धवन हा भारताचा 10वा खेळाडू ठरला आहे.

प्रसिद्ध कृष्णानेही विक्रम केला

धवन व्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने 2022 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही केला. वास्तविक, कृष्णाने 2022 च्या 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 विकेट घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi River: मांडवी नदीचे पात्र प्रदूषितच! प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल अखेर उच्च न्यायालयात सादर

Goa Bench: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा सुचवा! गोवा खंडपीठाचे आमदार संकल्प आमोणकरांसह स्थानिकांना थेट निर्देश; सुनावणी 21 जुलैपर्यंत तहकूब

Goa Bench: चिंबलमधील बेकायदेशीर 43 बोअरवेल्स मालकांना मोठा दणका! गोवा खंडपीठाचे भूजल अधिकाऱ्यांना कठोर दंडात्मक कारवाईचे आदेश

Goa Agriculture: कमी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना; गरज भासल्यास नुकसान भरपाई देण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी ग्वाही

Goa Education: उज्ज्वल भविष्यासमोर गळतीचे मोठे आव्हान! 28 % विद्यार्थी पोहोचत नाहीत बारावीपर्यंत; राज्यातील स्थिती, 'युडीआयएसई प्लस' अहवालातून समोर

SCROLL FOR NEXT