Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: श्रेयस अय्यरने कपिल देवच्या रेकॉर्डची केली बरोबरी; विश्वचषकात तब्बल 40 वर्षांनंतर घडला 'हा' पराक्रम

Shreyas Iyer, IND vs SL: भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर श्रीलंकेविरुद्ध फॉर्ममध्ये परतला.

Manish Jadhav

Shreyas Iyer, IND vs SL: भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर श्रीलंकेविरुद्ध फॉर्ममध्ये परतला. त्याने 56 चेंडूत 82 धावांची तूफानी खेळी खेळली. 2023 च्या विश्वचषकातील हे त्याचे दुसरे अर्धशतक होते. अय्यरने या डावात एकच नाही तर अनेक पराक्रम केले.

त्याने 2023 च्या विश्वचषकातील सर्वात लांब षटकार ठोकला. वनडेमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. इतकंच नाही तर 40 वर्षांपूर्वी कपिल देव यांनी एक पराक्रमही केला होता. आम्ही बोलतोय त्या भारतीय खेळाडूंबद्दल ज्यांनी एकदिवसीय विश्वचषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकले होते.

दरम्यान, श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 82 धावांच्या खेळीत एकूण 6 षटकार ठोकले. कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध एका डावात सहा षटकार ठोकले होते. हे 40 वर्षांपूर्वी घडले होते. मात्र, रोहित शर्मानेही या विश्वचषकाच्या एका सामन्यात पाकिस्तानविरुद्ध सहा षटकार ठोकले. या यादीत सौरव गांगुली आणि युवराज सिंग आघाडीवर आहेत.

एकदिवसीय विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय

7 – सौरव गांगुली विरुद्ध श्रीलंका, टॉंटन (1999)

7 – युवराज सिंग विरुद्ध बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन (2007)

6 – कपिल देव विरुद्ध झिम्बाब्वे, टुनब्रिज वेल्स (1983)

6 – रोहित शर्मा विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद (2023)

6 – श्रेयस अय्यर विरुद्ध श्रीलंका, मुंबई- वानखेडे, (2023)

टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली

भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, शुभमन गिलने सर्वाधिक 92 धावा केल्या. तर विराट कोहलीने (Virat Kohli) 88 धावांची शानदार खेळी करत पुन्हा एकदा आपला फॉर्म दाखवला. यानंतर श्रेयस अय्यरच्या 56 चेंडूत 82 धावांची शानदार खेळी आणि रवींद्र जडेजाच्या 35 धावांच्या जोरावर भारताने 357 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

या सामन्यापूर्वी भारतीय संघाने सलग सहा विजयांची नोंद केली होती. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने पहिल्या चेंडूवर पहिली विकेट घेतली. त्यानंतर मोहम्मद सिराजने पहिल्या दोन षटकांत तीन बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT