Dunith Wellalage Record  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: दुनिथ वेलालागेने रचला इतिहास, टीम इंडियाच्या दिग्गजांना दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता!

Manish Jadhav

Dunith Wellalage Record IND vs SL: आशिया चषक 2023 च्या सुपर-4 चा चौथा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जात आहे.

टीम इंडियाने या सामन्यात दमदार सुरुवात केल्यानंतर, श्रीलंकेच्या एका गोलंदाजाने आपल्या करिष्माई गोलंदाजीने सर्वांना चकित केले. 20 वर्षीय फिरकीपटू दुनिथ वेलालागेने शानदार गोलंदाजी केली.

दुनिथने आपल्या 4 षटकांत टीम इंडियाच्या 3 विकेट काढल्या. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या स्टार फलंदाजांना दुनिथने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

दुनिथने शुभमन गिल आणि रोहित शर्माला बोल्ड केले, त्यानंतर विराट कोहलीला दसून शनाकाकरवी झेलबाद केले.

दरम्यान, दुनिथने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाची फलंदाजी उद्ध्वस्त केली. त्याने आपल्या स्पेलच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहली (Virat Kohli), केएल राहुल आणि हार्दिक पांड्याला बाद केले. या स्टार युवा गोलंदाजाने 10 षटकात 40 धावा देत 5 बळी घेतले. आपल्या कारकिर्दीत 5 विकेट घेण्याची त्याची पहिलीच वेळ आहे.

एकदिवसीय सामन्यात 5 बळी घेणारा दुनिथ हा श्रीलंकेचा सर्वात तरुण गोलंदाज ठरला

दुनिथने पाच विकेट घेवून नवा विक्रम केला. एकदिवसीय डावात 5 बळी घेणारा तो श्रीलंकेचा (Sri Lanka) सर्वात तरुण गोलंदाज ठरला. तसेच, भारताविरुद्ध पाच विकेट घेणारा तो श्रीलंकेचा चौथा स्पिनर ठरला. दुनिथची विस्फोटक गोलंदाजी पाहून क्रिकेटजगतही थक्क झाले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे पदार्पण केले

दुनिथने यापूर्वी कसोटी पदार्पण केले आहे. गतवर्षी त्याने पाकिस्तानविरुद्ध गॉलमध्ये पदार्पण केले होते, मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नव्हती.

गेल्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणात त्याने 7 षटकांत 2 बळी घेतले होते.

दुनिथने याआधी 12 एकदिवसीय सामन्यात 13 बळी घेतले आहेत. तो कधीकधी चांगली फलंदाजीही करतो. त्याने प्रथम श्रेणीमध्ये 78 धावांची नाबाद खेळीही खेळली आहे.

विशेष म्हणजे, दुनिथचा वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये स्टँडबाय खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता, परंतु त्याने ज्या पद्धतीने कामगिरी केली त्यामुळे सगळीकडेच त्याचीच चर्चा झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT