Jaspreet Bumrah & Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND VS SCO: जसप्रीत बुमराह बनला भारताचा नंबर 1 'विकेट वीर', विश्वविक्रमही मोडला

टीम इंडियाने (Team India) शुक्रवारी T20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) मध्ये चमकदार कामगिरी केली.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाने (Team India) शुक्रवारी T20 विश्वचषक 2021 (T20 World Cup 2021) मध्ये चमकदार कामगिरी केली. विशेषत: गोलंदाजांनी स्कॉटिश फलंदाजांना नामोहरम केले. भारताने स्कॉटिश संघाला केवळ 85 धावांत गुंडाळले. भारताकडून शमी आणि जडेजाने 3-3 विकेट घेतल्या मात्र जसप्रीत बुमराहने केवळ 10 धावांत 2 विकेट काढल्या. बुमराहचा इकॉनॉमी रेट प्रति षटक फक्त 2.7 धावा होता आणि या कामगिरीदरम्यान त्याने एक मोठा विश्वविक्रमही केला.

जसप्रीत बुमराहने (Jaspreet Bumrah) स्कॉटलंडविरुद्धही मेडन ओव्हर टाकले, ज्यासह तो टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर टाकणारा खेळाडू ठरला. बुमराहकडे T20 मध्ये 8 मेडन षटके आहेत तर नुआन कुलसेकरा आणि मुस्तीफिजुर रहमान 6-6 मेडनसह आहेत.

भारताचा नंबर 1 'विकेट वीर'

जसप्रीत बुमराह 2 विकेट्ससह T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. बुमराहने युजवेंद्र चहलला मागे टाकले, ज्याच्या नावावर 63 बळी आहेत. बुमराह आता 64 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेटसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

या सामन्यात बुमराहसोबत शमीनेही मेडन ओव्हर टाकले आणि दोघांनीही एकाच षटकात विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारतीय संघाकडून असे घडण्याची ही दुसरी वेळ आहे. 2016 आशिया चषक स्पर्धेत हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांनी पहिली विकेट टाकली होती. रवींद्र जडेजाने स्कॉटलंडविरुद्ध अवघ्या 15 धावांत 3 विकेट घेतल्या, जी त्याची T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT