India vs South Africa  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: टीम इंडियाला आज केपटाऊनमध्ये विजय मिळवणे आवश्यक

पर्लमध्ये सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया (Team India) विजयाच्या शोधात केपटाऊनमध्ये (Cape Town).

दैनिक गोमन्तक

IND vs SA: पर्लमध्ये सलग दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया (Team India) विजयाच्या शोधात केपटाऊनमध्ये (Cape Town). पोहोचली आहे. म्हणजेच सध्याच्या दौऱ्यावर ज्या ठिकाणी भारताने कसोटी मालिका गमावली आहे. त्यानंतर आता आज होत असलेली वनडे मॅच हरली, तर मालिकेत क्लीन स्वीप होईल. तसे होवू नये आणि सन्माजनक घरवापसी व्हावी यासाठी टीम इंडियाला आज केपटाऊनमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे.

नवीन वर्षात झालेले दोन्ही एकदिवसीय सामने भारताने गमावले आहेत. भारताने पहिला एकदिवसीय सामना 31 धावांनी हारला तर दक्षिण आफ्रिकेने (South Africa) दुसऱ्या वनडेत 7 गडी राखून भारताला मात दिली. या सलग दोन विजयांसह दक्षिण आफ्रिकेने वनडे मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजषजर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर एकदिवसीय क्रिकेटच्या फॉरमॅटमधील विजयाचे खातेही नवीन वर्षात उघडले जाईल.

केपटाऊनमधील रिपोर्ट कार्ड

केपटाऊनमधील न्यूलँड्स मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांचा इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे. केपटाऊनमध्ये आतापर्यंत दोन्ही संघ 4 वेळा आमनेसामने आले आहेत. म्हणजेच केपटाऊनमध्ये दोन्ही संघांनी 4 वनडे सामने खेळले आहेत. यातील 2 सामने भारताने जिंकले आहेत, तर 2 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत.

भारताला विजय आवश्यक

याशिवाय न्यूलँड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या 4 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने शेवटचे दोन सामने जिंकले आहेत. भारताने 2010 नंतर हे दोन्ही सामने खेळले आणि जिंकले. अशा स्थितीत केपटाऊनमधील शेवटचे दोन एकदिवसीय सामने जिंकून आजचा सामना भारताने जिंकला तर भारताची विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण होईल. त्यामुळे भारताचा आफ्रिकेविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत थोडी तरी लाज वाचेल. म्हणजेच सध्याच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप होण्यापासून टीम इंडिया वाचणार आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा शेवटही या विजयाने टिम इंडीया करू शकणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

SCROLL FOR NEXT