KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: शुभमन, रोहित, कोहलीनंतर केएल राहुलची खास कामगिरी; द्रविडचा मोडला 19 वर्ष जुना विक्रम!

KL Rahul: केएल राहुलने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 56 धावांची खेळी खेळली. त्याने ही धावसंख्या 64 चेंडूंचा सामना करत 7 चौकारांच्या मदतीने केली.

Manish Jadhav

IND vs SA 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गकबेराह येथील सेंट जॉर्ज पार्क येथे खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुलने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 56 धावांची शानदार खेळी खेळली. या सामन्यात केएल राहुलशिवाय सलामीवीर फलंदाज साई सुदर्शननेही 62 धावांची खेळी केली. या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला 212 धावांचा लक्ष्य दिले. मात्र, या दोघांशिवाय भारताच्या इतर फलंदाजांना या सामन्यात म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. दरम्यान, या खेळीच्या जोरावर केएल राहुलने 2023 मध्ये एकदिवसीय सामन्यात 1000 धावा पूर्ण केल्या आणि युवराज सिंग, एमएस धोनी, राहुल द्रविड यांसारख्या दिग्गजांच्या यादीत सामील झाला.

1000 धावा करणारा केएल राहुल चौथा फलंदाज ठरला

दरम्यान, केएल राहुलने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 56 धावांची खेळी खेळली. त्याने ही धावसंख्या 64 चेंडूंचा सामना करत 7 चौकारांच्या मदतीने केली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत भारताला केवळ 212 धावांवर रोखले. तथापि, या खेळीच्या जोरावर केएल राहुलने 2023 मध्ये एकदिवसीय सामन्यात 1000 धावा पूर्ण केल्या आणि या वर्षात तो भारतासाठी 1000 धावांचा टप्पा पार करणारा चौथा फलंदाज ठरला. या वर्षाच्या सुरुवातीला शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी हा पराक्रम केला आहे.

केएल राहुल दिग्गज खेळाडूंच्या यादीत सामील झाला

KL राहुलने या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 धावांचा आकडा गाठला आणि एका वर्षात एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 धावांचा आकडा गाठणारा भारताचा सहावा मधल्या फळीतील फलंदाज ठरला. केएल राहुलच्या आधी, भारताकडून मधल्या फळीतील फलंदाज म्हणून एका वर्षात 1000 किंवा त्याहून अधिक धावा करणारे फलंदाज युवराज सिंग, एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा आणि राहुल द्रविड होते. इतकंच नाही तर मधल्या फळीत एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत राहुल आता तो पाचव्या स्थानावर पोहोचला. त्याने यामध्ये राहुल द्रविड मागे सोडले.

एका वर्षात मधल्या फळीतील फलंदाजांनी वनडेमध्ये केल्या सर्वाधिक धावा (4-7)

1107 धावा – युवराज सिंग (2007)

1097 धावा – एमएस धोनी (2008)

1079 धावा – मोहम्मद. अझरुद्दीन (1997)

1047 धावा – अजय जडेजा (1999)

1039 धावा – केएल राहुल (2023)

1025 धावा – राहुल द्रविड (2004)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT