Rohit Sharma & Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: रोहित-विराट खेळणार नाहीत न्यूझीलंडविरुद्धचा शेवटचा वनडे सामना! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Virat Kohli And Rohit Sharma: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

Virat Kohli And Rohit Sharma: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने (Wasim Jaffer) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. रोहित-विराटने हा सल्ला पाळल्यास ते वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यातून बाहेर पडू शकतात.

वसीम जाफरने हा महत्त्वाचा सल्ला दिला आहे

टीम इंडियाला (Team India) न्यूझीलंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंनी रणजी ट्रॉफी खेळली पाहिजे, जेणेकरुन त्यांना कसोटी मालिकेपूर्वी लय मिळेल, असे वसीम जाफरचे मत आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना वसीम जाफर म्हणाला की, 'मला वाटते (रणजी ट्रॉफी खेळणे) याचे अनेक अर्थ आहेत. जर ते एक रणजी सामना खेळले तर त्यांना दोन डाव मिळतील. तुम्ही कितीही अनुभवी असलात, तरी तुम्हाला सामन्यात वेळेची गरज असते, विशेषत: लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये.'

टीम इंडियाला नंबर-1 बनण्याची संधी आहे

वसीम जाफर पुढे म्हणाला की, 'या सर्व दृष्टिकोनातून एक मोठी मालिका आहे, मग ती जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल असो, ज्यामध्ये भारत (India) आपले स्थान बनवू शकतो किंवा जगातील नंबर-1 कसोटी संघ बनू शकतो. विराट कोहली गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. तर रोहितसह इतर अनेक खेळाडूंचीही तीच अवस्था आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fish Market: गणपती विसर्जनानंतर मासळी मार्केट पुन्हा गजबजले; भाव ऐकून ग्राहकांच्या कपाळावर आठ्या, सुरमई 900 रुपये किलो

Modi Cabinet Reshuffle: मंत्र्यांचे ग्रेडिंग ठरवणार त्यांचे राजकीय भवितव्य! लवकरच बदलणार मोदी मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा? दिल्लीच्या पॉवर कॉरिडोअरमध्ये हालचालींना वेग

Goa Weather: गोव्यात पुन्हा पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, राज्यात 'यलो अलर्ट'

Rashol MRF Case: 'एमआरएफ'ची मूळ फाईल बीडीओकडे कशी पोहोचली? राशोल कचरा प्रक्रिया शेड प्रकरणात गोवा खंडपीठाचा सवाल

Online Services: सरकारची मोठी डिजिटल सुविधा; आता व्हॉट्स-ॲपवरून मिळणार सरकारी सेवा, AI चॅटबॉटचा शुभारंभ

SCROLL FOR NEXT