पहिल्या डावात देखील आम्ही 95 धावांची भक्कम आघाडी (We have a strong lead of 95 runs) घेऊ असेही वाटले नव्हते. Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: आम्हाला 95 धावांची भक्कम आघाडी मिळेल अशी अपेक्षा नव्हती - कोहली

दुसऱ्या डावात आम्ही फास्ट सुरुवात केली, आम्हाला माहिती होते पाचव्या दिवशी आम्हाला संधी मिळू शकते. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, त्यात आता कोण बाजी मारेल हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

दैनिक गोमन्तक

IND vs ENG यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला, पावसाने 5 दिवशी भारताच्या (India) विजयावर पाणी फिरविले. इंग्लंडने (England) भारतासमोर विजयासाठी 209 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली, 4 दिवस अखेर भारताने 1 बाद 52 धावा केल्या होत्या. 5 व्या दिवशी भारतीय संघाला केवळ 157 धावा हाव्या होत्या. भारत हा सामना सहज जिंकेल असे वाटत असतानाच 5 व्या दिवशीचा संपूर्ण खेळ पावसामुळे पाण्यात गेल्याने एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. त्यामुळे भारताच्या विजयाच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले.

सामन्यानंतर बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहली (India captain Virat Kohli) म्हणाला, 5 व्या दिवशी आम्हाला पावसाची अजिबात अपेक्षा नव्हती. तसेच पहिल्या डावात देखील आम्ही 95 धावांची भक्कम आघाडी (We have a strong lead of 95 runs) घेऊ असेही वाटले नव्हते. परंतु आम्ही चांगला खेळ केला. या आघाडीमुळे भारतीय संघ या सामन्यात मजबुत स्थिती होतो. सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पावसाची शक्यता होती. परंतु पाऊस पाचव्या दिवशी आला. दुसऱ्या डावात आम्ही फास्ट सुरुवात केली, आम्हाला माहिती होते पाचव्या दिवशी आम्हाला संधी मिळू शकते.

आम्ही सामना जिंकण्यासाठीच खेळ होतो. यामुळेच आम्ही सामन्यात पकड मिळवली. 40 धावांची आघाडी बनविण्याची आमची रणनीति होती. पण आम्ही ती 95 धावांची बनविली तीच आमच्यासाठी चांगली ठरली. उर्वरित मालिकेत आम्ही हिच प्लेइंग इलेव्हन पुन्हा खेळवू शकतो. हा संघ ताकदीचा संघ आम्हाला वाटत आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, त्यात आता कोण बाजी मारेल हे पाहणे औत्सुक्याचे आहे. असे विराटने नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT