Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: टीम इंडियाला मोठा झटका? पहिल्याच सामन्यातून कोहली होऊ शकतो आउट

भारत आणि इंग्लंड यांच्यात मंगळवारपासून एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Virat Kohli England vs India 1st ODI Kennington Oval London: भारत आणि इंग्लंड यांच्यात मंगळवारपासून एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. परंतु मालिकेपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. विस्फोटक फलंदाज विराट कोहली पहिल्या एकदिवसीय सामन्यातून आउट होऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान कोहलीला पाठदुखीचा त्रास सुरु झाला होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत (India) आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यापूर्वी सोमवारी झालेल्या सरावाला कोहली पोहोचला नाही. तिसऱ्या सामन्यादरम्यान पाठदुखीचा त्रास सुरु झाला. याच कारणामुळे कोहली लंडनमधील ओव्हलमध्ये होणार्‍या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहलीचा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर स्थिती कळेल.

विशेष म्हणजे, सध्या कोहली खराब फॉर्मशी झगडत आहे. बऱ्याच दिवसांपासून त्याला शानदार कामगिरी करता आलेली नाही. T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात फक्त 1 धावा करुन कोहली बाद झाला. तर तिसऱ्या सामन्यात तो 11 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंडविरुद्ध (England) खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात कोहलीला विशेष काही करता आले नाही. याआधी त्याच्यावर आयपीएल 2022 (IPL 2022) मधील खराब कामगिरीबद्दलही टीका झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT