Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

''प्रत्येक फॉरमॅटमध्ये यॉर्कर हे बुमराहचे शस्त्र...''; डिव्हिलियर्सकडून नंबर-1 कसोटी गोलंदाजावर स्तुतीसुमनांचा वर्षाव

AB De Villiers: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीत शानदार गोलंदाजी केली.

Manish Jadhav

Jasprit Bumrah: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या विशाखापट्टणम कसोटीत शानदार गोलंदाजी केली. त्याने कसोटी सामन्यात 9 विकेट घेतल्या. त्याने 2 कसोटीत 15 विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीमुळे तो कसोटी क्रिकेटमधील नंबर-1 गोलंदाज बनला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा तो भारताचा (India) पहिला वेगवान गोलंदाज ठरला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने जसप्रीत बुमराहवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याने हिंदीत बुमराहचे कौतुक केले आहे. त्याच्या यॉर्करचे वर्णन ''सर्वात धोकादायक चेंडू'' असे करण्यात आले आहे.

एबी डिव्हिलियर्स बुमराहबद्दल म्हणाला की, “बुमराह शानदार गोलंदाजी करतो. जसप्रीत बुमराह उत्तम गोलंदाज आहे. त्याने इतर भारतीय गोलंदाजांना मागे टाकले, परंतु मला वाटते की इतरांनीही संधी साधली आणि एकत्रितपणे आक्रमण केले. इतर गोलंदाजांची आकडेवारी चांगली दिसत नाही, परंतु त्यांनी त्याच्यासाठी (Bumrah) एक वातावरण तयार केले. हा वैयक्तिक खेळ नाही.”

बुमराहच्या यॉर्करवर एबी डिव्हिलियर्स काय म्हणाला?

ओली पोपच्या स्टंप उखडल्यानंतर बुमराहचा यॉर्कर बॉल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. डिव्हिलियर्सने सांगितले की, ''जेव्हाही तो त्याच्याविरुद्ध खेळतो तेव्हा तो नेहमी यॉर्करचाच विचार करतो.'' तो पुढे म्हणाला की, “यॉर्कर हे प्रत्येक फॉरमॅटमध्ये बुमराहचे शस्त्र आहे. त्याच्याविरुद्ध खेळताना मला त्याच्या यॉर्कर्सचा नेहमीच धोका वाटतो. कसोटीतही तो खूप विकेट घेतो.”

कसोटीत नंबर-1 गोलंदाज ठरणारा चौथा भारतीय

दुसऱ्या कसोटीतील कामगिरीमुळे जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स, दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा आणि रविचंद्रन अश्विन यांना मागे टाकले. अश्विन, रवींद्र जडेजा आणि बिशन सिंग बेदी यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये नंबर-1 गोलंदाज बनणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला. बुमराहचे 881 रेटिंग गुण आहेत, तर अश्विन (904) आणि जडेजा (899) हे सर्वोच्च रेटिंग असलेले भारतीय गोलंदाज आहेत. अश्विन आणि जडेजा यांचा मार्च 2017 मध्ये संयुक्तपणे अव्वल स्थानी राहण्याचा अनोखा विक्रम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

Goa Bison Car Accident: गोव्यात धावत्या कारला गवा रेड्याची जोरदार धडक, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; चालक थोडक्यात बचावला!

VIDEO: "याच्या ओव्हरअ‍ॅक्टिंगचे 50 पैसे कापा" मोहम्मद रिझवान अन् लिटन दास यांच्यात जोरदार बाचाबाची; बांगलादेशी खेळाडूंनी उडवली खिल्ली

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाच्या चर्चेदरम्यान मोदी सरकारचा मोठा निर्णय, 'या' सरकारी कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी; ओल्ड पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

SCROLL FOR NEXT