Prithvi Shaw & Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

IND VS ENG: मुंबईचे 'हे' दोन खेळाडू इंग्लंडवारीसाठी सज्ज!

इंग्लंडमधील (England) टीम इंडियाच्या तीन खेळाडूंच्या दुखापतीनंतर या दोन्ही खेळाडूंना बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

टीम इंडियाचा (Team India) विस्फोटक फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि मधल्या फळीतील जलगदती फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांची इंग्लंडवारी निश्चित झाली आहे. इंग्लंडमधील (England) टीम इंडियाच्या तीन खेळाडूंच्या दुखापतीनंतर या दोन्ही खेळाडूंना बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात येत आहे. आवेश खान, शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुदंर इंग्लंड दौऱ्यादरम्यान दुखापतग्रस्त झाले आणि आता तिघे खेळाडू इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेला मुकणार आहेत. त्यानंतर टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने काही खेळाडू इंग्लंडला पाठवण्याची मागणी केली होती, जी आता भारतीय संघाच्या निवड समितीने मान्यता दिली आहे.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, पृर्थ्वी शॉ आणि सूर्यकुमार यांची निवड इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी करण्यात आली आहे. या दोन्ही खेळाडूंच्या नावावरुन टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी निवड झाली आहे. त्यानंतर चेतन शर्मा यांच्या निवड समितीने अखेर हा निर्णय घेतला. भारतीय संघाने इंग्लंडला तीन खेळाडू पाठविण्याची मागणी केली होती. मात्र आत्तापर्यंत तिसऱ्या खेळाडूच्या नावाचा समावेश झालेला नव्हता. माध्यम रिपोर्टनुसार, जयंत यादव यांच्याही नावाची चर्चा होते, परंतु अद्याप त्याच्या नावाची पुष्टी झालेली नाही.

पृर्थ्वी आणि सूर्यकुमार यादव फॉर्मात

श्रीलंका दौऱ्यावर पृर्थ्वी आणि सूर्यकुमार यादव असून हे दोघेजण कमाल फॉर्ममध्ये आहेत. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेमध्ये सूर्यकुमार यादवने 62 च्या सरासरीने 124 धावा काढल्या आहेत. तसेच त्याचा स्ट्राइक रेट 122.77 असा होता. सूर्यकुमारला दरम्यान या सीरीजमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताबही मिळाला.

दरम्यान पृर्थ्वी शॉने तीन सामन्यात 35 च्या सरासरीने 105 धाका काढल्या. पृर्थ्वीने सामन्यादरम्यान विस्फोटक फलंदाजी केली मात्र तो मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला. आता पृर्थ्वी आणि सूर्यकुमार दोघेजण इंग्लंडला रवाना होतील. आता हे दोघेजण थेट श्रीलंकेहून इंग्लंडला जाणार आहेत. त्यांना भारतात परतावे लागेल हे अद्याप समजू शकलेले नाही. चार ऑगस्टपासून इंग्लंडविरुध्दच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT