Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

'विराट 30 धावांपर्यंत पोहोचला तर..', इंग्लंड कसोटी दरम्यान मायकल वॉनचे भाकीत

भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅममध्ये खेळला जाणारा कसोटी सामना पावसामुळे थांबवण्यात आला

दैनिक गोमन्तक

INDvsENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या सामन्यात जिंकल्यास किंवा अनिर्णित राहिल्यास कसोटी मालिकेवर कब्जा करेल. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील, जो बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय शतकाची वाट पाहत आहे. (Michael Vaughan on Virat Kohli)

आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही विराट कोहलीबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहलीने 30 धावांचा टप्पा गाठला तर तो शतक झळकावू शकतो, असा विश्वास वॉनला वाटतो.

'सर्वांच्या नजरा एजबॅस्टन येथे भारतीय खेळाडू विराट कोहलीवर खिळल्या आहेत. काही वर्षांपूर्वी या मैदानावर त्याने कसोटी सामन्यात सर्वात मोठे शतक झळकावले होते. तो चांगली खेळी खेळू शकतो असे मला वाटते. मागे वळून पाहता, त्याने शतक ठोकून किती दिवस झाले? विराट कोहलीला बराच काळ लोटला आहे. जर तो 30 पर्यंत पोहोचला तर मला वाटते की तो तिहेरी अंकांपर्यंत पोहोचेल ज्याची तो बऱ्याच काळापासून वाट पाहत होता.

भारताचा रेकॉर्ड चांगला नाही

एजबॅस्टनमध्ये भारताचा विक्रम काही खास राहिला नाही. या मैदानावर भारताने सात पैकी सहा सामने गमावले असून उर्वरित एक सामना अनिर्णित राहिला आहे.भारत मालिका जिंकण्याच्या मार्गावर असल्याने हा सामना खूपच रोचक होणार आहे. दुसरीकडे, बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील यजमानांना हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे.

शेवटचे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये आले

33 वर्षीय विराट कोहलीने भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावून बराच काळ लोटला आहे. कोहलीने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक झळकावले. त्यानंतर कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर त्याने 136 धावांची इनिंग खेळली. त्यानंतर विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नाही.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅममध्ये खेळला जाणारा कसोटी सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे कव्हर्स मैदानावर आली असून सर्व खेळाडू मैदान सोडून गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT