Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs ENG: टीम इंडियाला झटका, चौथ्या कसोटी सामन्यातून बुमराह अन् KL राहुल बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Jasprit Bumrah Ruled Out Ranchi Test India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना झारखंडची राजधानी रांची येथे 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Manish Jadhav

Jasprit Bumrah Ruled Out Ranchi Test India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना झारखंडची राजधानी रांची येथे 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तत्पूर्वी, टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह रांची कसोटीतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने बुमराहबाबत ट्विट करुन या निर्णयाची माहिती दिली आहे. 23 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटीपूर्वी टीम इंडियामध्ये बदल पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे. आता मालिका जिंकण्याचे टीम इंडियाला वेध लागले असले तरी बुमराहशिवाय भारतीय गोलंदाजांसाठी हा मार्ग सोपा असणार नाही.

बुमराहची जागा कोण घेणार?

दरम्यान, बीसीसीआयने चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराहला रिलीज केले आहे. एवढेच नाही तर संघातही बदल करण्यात आला आहे. बुमराहच्या जागी मुकेश कुमारचा रांची कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. राजकोट कसोटीपूर्वी मुकेशला रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर त्याने रणजी करंडकमध्ये चमकदार कामगिरी केली. आता तो टीम इंडियाच्या संघात परतला आहे. मात्र, त्याला रांचीमध्ये खेळाला मिळते की आकाशदीप पदार्पण करणार हे पाहणं औत्सुक्याचे असणार आहे.

बुमराहने चमकदार कामगिरी केली

जर आपण सध्याच्या मालिकेबद्दल बोललो तर जसप्रीत बुमराहने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. विशाखापट्टणम कसोटीत 9 विकेट घेण्यासोबतच त्याने या मालिकेतील तीन सामन्यांत एकूण 17 बळी घेतले. त्याची अनुपस्थिती टीम इंडियासाठी निश्चितच धक्कादायक ठरेल. बोर्डाने म्हटले की, 'बुमराहला त्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आणि वर्कलोड व्यवस्थापनामुळे विश्रांती देण्यात आली आहे.' दरम्यान, केएल राहुल चौथ्या कसोटीतूनही बाहेर पडला आहे.

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT