Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: विराटने झळकावले 'शतक', दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी महारेकॉर्ड

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.

Manish Jadhav

Virat Kohli IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या मैदानावर फलंदाजीसाठी उतरताच विराट कोहलीने एक मोठा विक्रम केला आहे. विराटने असा पराक्रम केला आहे, जो यापूर्वी केवळ महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेच केला होता.

विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 डावात फलंदाजी करणारा विराट कोहली हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटपूर्वी केवळ सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 किंवा त्याहून अधिक डावात फलंदाजी केली आहे.

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये 41 आणि टी-20 मध्ये 21 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. त्याचवेळी, त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीतील ही 38वी खेळी आहे.

सचिन तेंडुलकरने सर्वाधिक खेळी खेळल्या

सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 144 डावात फलंदाजी केली आहे. या डावांमध्ये सचिन तेंडुलकरने 49.68 च्या सरासरीने 6707 धावा केल्या. यादरम्यान सचिन तेंडुलकरच्या बॅटने 31 अर्धशतके आणि 20 शतके झळकली आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीने (Virat Kohli) या 100 डावांमध्ये 51+ च्या सरासरीने 4500 हून अधिक धावा केल्या आहेत.

विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे

उभय संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यात भारतीय चाहत्यांना विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. 2019 पासून त्याने कसोटीत एकही शतक झळकावलेले नाही. त्याचबरोबर या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा आणि केएल राहुलसारखे फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. ऍशेसमध्ये विराट कोहलीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT