Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs Aus 3rd T20: तिसरा टी-20 सामना जिंकून टीम इंडियाने जिंकली मालिका

India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला.

दैनिक गोमन्तक

Ind vs Aus 3rd T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या निर्णायक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 7 बाद 186 धावा केल्या. भारताला मालिका जिंकण्यासाठी 187 धावा करायच्या होत्या. कांगारुंसाठी जोस इंग्लिसने 52 आणि टीम डेव्हिडने 54 धावा केल्या. डॅनियल सेम्सनेही नाबाद 28 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने तीन बळी घेतले. मात्र टीम इंडियाने तिसरा आणि शेवटचा निर्णायक सामना जिंकला.

कोहली-सूर्यकुमारचा झंझावात

इंडियाकडून स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 69 धावा केल्या. सूर्यकुमार यादवशिवाय विराट कोहलीने (Virat Kohli) 63 धावांची खेळी केली. हार्दिक पांड्याने 16 चेंडूत 25 धावा केल्या. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) चौकार मारुन भारताला विजय मिळवून दिला.

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर मालिका जिंकण्यासाठी 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते

प्रथम फलंदाजी करताना टीम डेव्हिड आणि सलामीवीर कॅमेरुन ग्रीनच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने (Australia) 20 षटकांत 7 गडी गमावून 186 धावा केल्या होत्या. मालिका जिंकण्यासाठी भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य होते. टीम डेव्हिडने 27 चेंडूत चार षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या, तर ग्रीनने 21 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 52 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT