Josh Inglis  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: पहिल्याच T20 सामन्यात जोश इंग्लिसचा धूमधडाका, 47 चेंडूत झळकावले कारकिर्दीतील पहिले 'शतक'!

Manish Jadhav

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या T20 सामन्यात जोश इंग्लिसने शतक झळकावले. एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग असलेल्या जोश इंग्लिसने पहिल्या T20 सामन्यात शानदार फलंदाजी केली. इंग्लिसने 47 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू शॉर्टने डावाची सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट 31 धावांवर पडली. मॅथ्यू शॉर्टने 11 चेंडूत 13 धावा केल्या.

5व्या षटकात फलंदाजीला आलेल्या इंग्लिसने स्टीव्ह स्मिथसोबत शतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली.

दरम्यान, स्टार फलंदाज जोश इंग्लिसने 47 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. इंग्लिसने 17व्या षटकात अर्शदीपविरुद्ध चौकार मारुन हॅट्ट्रिक साधून शतक पूर्ण केले.

मात्र, शतक पूर्ण केल्यानंतर जोश जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि 18व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जोशने 50 चेंडूत 110 धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने 11 चौकार आणि 8 षटकार मारले.

दुसरीकडे, स्टीव्ह स्मिथ आणि जोश इंग्लिस यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी झाली. स्टीव्ह स्मिथ 41 चेंडूत 52 धावा करुन बाद झाला. भारताविरुद्धच्या (India) पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तीन गडी बाद 208 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने 110 तर स्टीव्ह स्मिथने 52 धावा केल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दरम्यान, इंग्लिस ऑस्ट्रेलियासाठी (Australia) सर्वात वेगवान शतक करणारा खेळाडू बनला. त्याने माजी कर्णधार अॅरॉन फिंचच्या विक्रमाची बरोबरी केली. मात्र, टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम नेपाळच्या कुशल मल्लाच्या नावावर आहे, ज्याने 34 चेंडूत शतक झळकावले होते.

AUS साठी सर्वात वेगवान शतक

अॅरॉन फिंच- 47 चेंडू, 2013 (वि. इंग्लंड)

जोश इंग्लिस- 47 चेंडू, 2023 (भारत वि.)

ग्लेन मॅक्सवेल- 49 चेंडू, 2016 (वि श्रीलंका)

ग्लेन मॅक्सवेल- 50 चेंडू, 2019 (वि. भारत)

डेव्हिड वॉर्नर- 56 चेंडू, 2019 (वि श्रीलंका)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: 'वेलिंकरांना अटक करा, नाहीतर...'; संतप्त जमावाचा सरकारला अल्टिमेटम; डिचोलीत गुन्हा दाखल!

Rashi Bhavishya 5 October 2024: बिझनेसमध्ये धनप्राप्तीचा योग, पितृसुखाची छाया आणि खरेदीचा उत्तम संयोग; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Delhi Drug Case: मोठा खुलासा! गोव्यामार्गे दिल्लीत पोहोचले ड्रग्ज; साडेपाच हजार कोटींच्या 562 किलो कोकेन‌ची तस्करी

गोवा राजभाषा कायद्यात मराठी नको म्हणाणाऱ्या दामोदर मावजो यांची अभिजात दर्जानंतर पहिली प्रतिक्रिया; स्पृश्य - अस्पृश्यतेचा केला उल्लेख

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

SCROLL FOR NEXT