KL Rahul | Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, 1st ODI: टीम इंडियाने मारलं मुंबईचं मैदान! KL राहुलच्या झुंजार फिफ्टीनं ऑस्ट्रेलिया पराभूत

India vs Australia, 1st ODI: मुंबईत झालेल्या वनडे सामन्यात केएल राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला.

Pranali Kodre

India vs Australia 1st ODI: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या वनडे मालिकेतील पहल्या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 189 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 39.5 षटकात 5 विकेट्स गमावत 191 धावा करत पूर्ण केला. केएल राहुलने नाबाद अर्धशतकी खेळी करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

या सामन्यात 189 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताने ईशान किशन, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या तिघांच्या विकेट्स केवळ १६ धावांत गमावल्या होत्या विशेष म्हणजे पाचव्या षटकात मिशेल स्टार्कने विराट आणि सूर्यकुमारला लागोपाठच्या चेंडूवर बाद करत दुहेरी धक्का दिला होता.

त्यानंतर शुभमन गिललाही स्टार्कने 20 धावांवर मार्नस लॅब्युशेनच्या हातून झेलबाद करत भारताला 11 व्या षटकातच चौथा धक्का दिला होता. पण यानंतर मात्र केएल राहुलला कर्णधार हार्दिक पंड्याने चांगली साथ दिली. या दोघांनी संयमी खेळ करण्यास सुरुवात केली. त्यांची जोडी मैदानात चांगली जमली होती.

मात्र, त्यांची जोडी तोडण्याचे काम मार्कस स्टॉयनिसने केले. त्याने 20 व्या षटकात टाकलेल्या बाऊंसरवर हार्दिक 25 धावा करून कॅमेरॉन ग्रीनकडे झेल देत बाद झाला. त्यामुळे हार्दिक आणि केएल राहुलची 44 धावांची भागीदारी तुटली.

पण त्यानंतर केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांनी ऑस्ट्रेलियाला आणखी यश मिळणार नाही याची काळजी घेतली. सुरुवातीला त्यांनी संयम दाखवत खेळ केला. अखेर जोडी चांगली जमल्यावर त्यांनी काही चांगले शॉट्सही खेळले. दरम्यान, केएल राहुलने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. या दोघांनी मिळून सहाव्या विकेटसाठी नाबाद 108 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने हा सामना सहज जिंकला.

केएल राहुल 91 चेंडूत 75 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला. तसेच रविंद्र जडेजाने 69 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 45 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच मार्कस स्टॉयनिसने 2 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. पण ऑस्ट्रेलियाचा डाव 35.4 षटकातच केवळ 188 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने ट्रेविस हेडच्या रुपातच पहिली विकेट दुसऱ्या षटकात गमावली होती.

पण त्यानंतर मिशेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 72 धावांची भागीदारी केली. पण त्यांची जोडी हार्दिक पंड्याने तोडली. स्मिथचा 22 धावांवर हार्दिकच्या गोलंदाजीवर केएल राहुलने सुरेख झेल घेतला.

त्यानंतर मार्शला मार्नस लॅब्युशेननेही चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचीही जोडी 52 धावांच्या भागीदारीनंतर तुटली. आक्रमक अर्धशतकी खेळी केलेल्या मार्शला रविंद्र जडेजाने बाद केले. मार्शने 65 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकात 81 धावांची खेळी केली. यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या.

मार्शनंतर लॅब्युशेनला कुलदीप यादवने बाद केले. लॅब्युशेनचा 15 धावांवर रविंद्र जडेजाने शानदार झेल घेतला. मार्श बाद झाल्यानंतर केवळ 59 धावात ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्स गमावल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला केवळ 188 धावाच करता आल्या.

भारताकडून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. रविंद्र जडेजाने २ विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT