Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यातून विराटची माघार; राहुल द्रविडने दिले 'हे' कारण

T20 Series: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळणार नाही.

Manish Jadhav

IND vs AFG T20 Series: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (11 जानेवारी) होणार आहे. दोन्ही संघ प्रथमच T20 फॉरमॅटमधील द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने येणार आहेत. याआधी भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये टी-20 सामने खेळले गेले आहेत. आगामी T20 विश्वचषकापूर्वी तयारी करण्याची दोन्ही संघांना चांगली संधी आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळणार नाही. पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने याची पुष्टी केली. राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत सांगितले की, 'विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या सामना खेळणार नाही.' द्रविडने ओपनिंग जोडीबद्दलही सांगितले आहे. विराट कोहली दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात खेळणार आहे.

पत्रकार परिषदेत द्रविड म्हणाला की, ''विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिला टी-20 सामना खेळू शकणार नाही. रोहित आणि जयस्वाल उद्या डावाची सुरुवात करतील.'' या मालिकेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर रोहितची T20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व करण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढली आहे, जो जागतिक स्पर्धेत हार्दिकच्या कर्णधारपदाच्या महत्त्वाकांक्षेला मोठा धक्का आहे. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांचाही टी-20 संघात यष्टिरक्षक म्हणून समावेश केला आहे, मात्र ईशान किशनकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय निवड समितीने रविवारी मोहाली येथे 11 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या मालिकेसाठी रोहितच्या नेतृत्वाखाली 16 सदस्यीय संघाची घोषणा केली. रोहित आणि कोहली यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत या फॉरमॅटमध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. भारतीय संघ 11 जानेवारीला मोहालीत अफगाणिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे इंदूर आणि बंगळुरु येथे खेळवला जाईल.

दुसरीकडे, कसोटी संघातील नियमित सदस्य जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली असून ऋतुराज गायकवाड अद्याप खेळण्यास तंदुरुस्त नाही. हार्दिकच्या अनुपस्थितीत अष्टपैलू शिवम दुबेला संघात स्थान मिळाले आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT