India vs Afghanistan Football match Twitter
क्रीडा

Video: फुटबॉलच्या मैदानात अफगानिस्तानचा पराभव, सेलिब्रेशन करणाऱ्या भारतीय खेळाडूंना मारहाण

2016 नंतर अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा हा पहिला विजय ठरला.

दैनिक गोमन्तक

भारतीय फुटबॉल संघाने एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीच्या तिसर्‍या फेरीत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. शनिवारी कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा 2-1 असा पराभव केला. या सामन्यात भारताकडून कर्णधार सुनील छेत्री (86वा) आणि सहल अब्दुल समद (91वा) यांनी गोल केले. (India vs Afghanistan Fight)

यापूर्वी भारताने कंबोडियाचा 2-0 असा पराभव केला होता. या विजयानंतर, इगोर स्टिमेकचा संघ पुरुषांच्या AFC आशियाई चषक पात्रता फेरीतील त्यांच्या पुढील सामन्यात हाँगकाँगशी भिडणार आहे.

दुसरीकडे भारताविरुद्धचा सामना हरल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ते भारतीय खेळाडूंशी भिडले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अफगाणिस्तानचे 3 खेळाडू आणि भारतीय संघाचे 2 खेळाडू हाणामारी करताना दिसत आहेत.

भारताचा स्टार गोलकीपर गुरप्रीत सिंग प्रकरण शांत करण्यासाठी पुढे आला, परंतु अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी त्याला धक्का दिला. एएफसीचे अधिकारी मैदानावरील खेळाडूंना शांत करण्याचा प्रयत्न करतांना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांनी भर मैदानातच भारतीय खेळाडूंशी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा सामना कोलकात्याच्या व्हीवायबीके स्टेडियमवर खेळवला गेला होता.

जानेवारी 2016 नंतर भारतीय संघाचा अफगाणिस्तानविरुद्धचा हा पहिला विजय होता. यापूर्वी, गेल्या दोन वेळा अफगाणिस्तानच्या संघाला भारताला दोनदा बरोबरीत रोखण्यात यश आले होते. एकूण, भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध 11 सामने खेळले आहे, ज्यात सात जिंकले आहेत आणि एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध गोल केल्यानंतर भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने आता 128 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 82 गोल केले आहेत. अ‍ॅक्टिव फुटबॉलपटूंमध्ये फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) आणि लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) हे छेत्रीच्या पुढे आहेत. रोनाल्डोने 189 सामन्यांमध्ये 117 गोल केले आहेत आणि मेस्सीने 86 (162 सामने) केले आहेत.

दरम्यान, स्पर्धेच्या D गटातील चुरशीच्या लढतीमध्ये भारताने अफगाणिस्तानला 2-1 ने पराभूत करून संघासाठी महत्त्वाचे तीन गुण मिळवले आहेत. सामना चांगला रंगला असताना सुनील छेत्रीने फ्री-किकवर एक गोल केला. त्यानंतर अफगाणिस्ताननेही एक गोल करून सामन्यात पुनरागमन केले होते, मात्र शेवटी सहल अब्दुल समदच्या एका गोलने भारतीय संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT