मुख्यमंत्री चषक स्पर्धाचे उद्घाटन करताना मान्यवर Dainik Gomantak
क्रीडा

मुख्यमंत्री चषक स्पर्धेचे डिचोलीत थाटात उदघाटन

गोमंतभूमीला कला आणि संस्कृतीची (Art and culture) मोठी परंपरा आहे. आजच्या युवा पिढीने (Young generation) ही परंपरा अखंडितपणे पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर झेलण्यासाठी पुढे यावे.

दैनिक गोमन्तक

डिचोली: गोमंतभूमीला कला आणि संस्कृतीची मोठी परंपरा आहे. आजच्या युवा पिढीने ही परंपरा अखंडितपणे पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर झेलण्यासाठी पुढे यावे. असे आवाहन डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी केले आहे. डिचोली भाजयुमो आयोजित मुख्यमंत्री चषक अंतर्गत सांस्कृतिक (Cultural) स्पर्धाचे रविवारी उदघाटन केल्यानंतर सभापती पाटणेकर बोलत होते.

हिराबाई झाट्ये स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावेळी नगराध्यक्ष कुंदन फळारी, भाजप महिला मोर्चाची राज्य सरचिटणीस शिल्पा नाईक, डिचोली भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अनिकेत चणेकर आणि डॉ. शेखर साळकर उपस्थित होते.

आजचा युवावर्ग (Youth) सजग तेवढाच गुणसपन्न आहे. असे डॉ. शेखर साळकर यांनी यावेळी बोलताना सांगून, युवकांनी वाईट गोष्टीपासून दूर रहावे. असे आवाहन केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रत्येकवेळी कार्यकर्त्यांना स्फूर्ती देत असतात. ही भाजपसाठी ( BJP )शुभ गोष्ट आहे. असे कुंदन फळारी म्हणाले. विश्वास चोडणकर यांनीही आपले विचार मांडले.

अनिकेत चणेकर यांनी स्वागतपर भाषणात मुख्यमंत्री (CM) चषक अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धाची माहिती दिली. सूत्रसंचालन श्रद्धा धोंड यांनी केले. मकरंद परब यांनी आभार मानले.

उदघाटन सत्रानंतर समूह नृत्य, सोलो गायन आणि मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धानी महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT