Team India Dainik Gomantak
क्रीडा

SA vs IND, 3rd T20I: चायनामनच्या 5 विकेट्स, सूर्याचा शतकी जलवा; टीम इंडियाने मालिका बरोबरीत सोडवली

SA vs IND, 3rd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (14 डिसेंबर) खेळला गेला.

Manish Jadhav

SA vs IND, 3rd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (14 डिसेंबर) खेळला गेला. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने 20 षटकांत सात विकेट गमावून 201 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ 13.5 षटकांत 95 धावांत गारद झाला. भारताने हा सामना 106 धावांनी जिंकला. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. आता तिसरा सामना भारताने जिंकला. अशाप्रकारे तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली.

चायनामनच्या 5 विकेट्स

दरम्यान, या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संपूर्ण संघ 13.5 षटकांत 95 धावांवरच आटोपला. भारताने हा सामना 106 धावांनी जिंकला. आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सामन्यात सर्वाधिक 35 आणि एडन मार्करमने 25 धावा केल्या, तर 8 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने 2.5 षटकात 17 धावा देत 5 बळी घेतले.

दक्षिण आफ्रिकेच्या अशा विकेट पडल्या - (95 धावा, 13.5 षटके)

पहिली विकेट: मॅथ्यू ब्रीटजके (4), विकेट- मुकेश कुमार (4/1)

दुसरी विकेट: रीझा हेंड्रिक्स (8), विकेट- रनआउट (23/2)

तिसरी विकेट: हेन्रिच क्लासेन (5), विकेट- अर्शदीप सिंग (42/3)

चौथी विकेट: एडन मार्करम (25), विकेट- रवींद्र जडेजा (42/4)

पाचवी विकेट: डोनोवन फरेरा (12), विकेट- कुलदीप यादव (75/5)

सहावी विकेट: अँडिले फेहलुकवायो (0), विकेट- रवींद्र जडेजा (82/6)

सातवी विकेट: केशव महाराज (1), विकेट- कुलदीप यादव (89/7)

आठवी विकेट: नांद्रे बर्गर (1), विकेट- कुलदीप यादव (94/8)

नववी विकेट: लिझार्ड विल्यम्स (0), विकेट- कुलदीप यादव (94/9)

दहावी विकेट: डेव्हिड मिलर (35), विकेट- कुलदीप यादव (95/9)

दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 7 गडी गमावून 201 धावा केल्या होत्या. भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 100 धावांची खेळी केली. याशिवाय सलामीवीर यशस्वी जयस्वालनेही 60 धावांची शानदार खेळी केली. रिंकू सिंहने 14 आणि शुभमन गिलने 12 धावांचे योगदान दिले. या सामन्यात तिलक वर्मा फ्लॉप ठरला. तिलकला खातेही न उघडता आले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना केशव महाराज आणि विल्यम्सने प्रत्येकी 2 बळी घेतले. या सामन्यात केशव महाराजने शानदार गोलंदाजी करत पहिल्याच षटकात टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले.

भारतीय संघाच्या अशा विकेट पडल्या

पहिली विकेट: शुभमन गिल (12), विकेट- केशव महाराज (29/1)

दुसरी विकेट: तिलक वर्मा (0), विकेट- केशव महाराज (29/2)

तिसरी विकेट: यशस्वी जयस्वाल (60), विकेट- तबरेझ शम्सी (141/3)

चौथी विकेट: रिंकू सिंह (14), विकेट- नांद्रे बर्गर (188/4)

पाचवी विकेट: सूर्यकुमार यादव (100), विकेट- लिझार्ड विल्यम्स (194/5)

सहावी विकेट: रवींद्र जडेजा (4), विकेट- रनआउट (199/6)

सातवी विकेट: जितेश शर्मा (4), विकेट- लिझार्ड विल्यम्स (199/7)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT